* पातुर प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित * (दूल्हे खान युसुफ खान पातुर) प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर टिमला वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य सन्मान 2026 सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याचा गौरवशाली पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर टीमला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आदरणीय श्री प्रकाश आंबिडकर साहेबांच्या हस्ते गौरविण्यात आला.अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरीमुळे राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले आहे.* दि. २२ फेब्रुवारी २०२६** — राज्यातील आरोग्य निर्देशांकावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचा यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.राज्यातील आरोग्य संस्था, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी **वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार** प्रदान केला जातो. यामध्ये सोहळ्यात एक लाख रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येते.या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा परिषद अकोला आरोग्य विभागाचे राज्यभर कौतुक होत आहे.या सोहळ्यास मा ना प्रकाश आबीटकर (आरोग्यमंत्री), मा ना मेघनाताई बोर्डीकर (राज्य आरोग्यमंत्री) तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त संचालक उप संचालक अकोला उपस्थित होते.राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर (ता. पातुर, जि. अकोला) या संस्थेची निवड झाली. यानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला.अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरीमुळे राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0