महिला सक्षमीकरणाचा नवा 'आनंद मेळावा'! (महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.29:- वरोरा येथे कृषी उत्पन्न बाजार समीती मैदान वरचरा येथे आज 'धनोजे कुणबी महिला आघाडी'च्या वतीने आयोजित तीन दिवसीय आनंद मेळाव्याचे अतिशय उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या हाताला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर हा उपक्रम राबविला जात आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अँड. गजाननजी बोढाले होते.याप्रसंगी मला देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंतभाऊ टेंभुर्डे, धनोजे कुणबी समाज मंडळाचे सचिव कौरासे सर, बंडूभाऊ देऊळकर, अभयभाऊ टोंगे, बाजार समितीचे सचिव शिंदे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.एकाच छताखाली खाद्यपदार्थ, हस्तकला आणि विविध वस्तूंची रेलचेल असलेल्या या मेळाव्याला वरोरावासीयांनी नक्की भेट छ्यावी ही विनंती.

महिला सक्षमीकरणाचा नवा 'आनंद मेळावा'!                     
Previous Post Next Post