वाचनालयातील विद्यार्थ्यांनी केली, नैसर्गिक होळी साजरी. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी, येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालयातील, विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रित्या रंग बनवून होळी साजरी करण्यात आली. हिप्परगा थडी, हे गाव बिलोली तालुक्यातील माळ्याच्या कडेला बसलेली वस्ती असून, उत्तरेस माळ व दक्षिणेस मनमाड नदी व मध्यभागी हिप्परगा थडी गाव आहे, या ठिकाणी माळावरती उगवलेले,निसर्गाने पळसाच्या पानाचे फुलं, या फुलाचा रंग बनवून, विद्यार्थ्यांनी त्या रंगाची होळी साजरी करून, केमिकलने बनवलेल्या रंगाची होळी साजरी न करता नैसर्गिकरीत्या रंगाची होळी साजरी करावी असे आपणाला दिलेल्या, पळसाच्या पानाच्या फुलाची रंग बनवून होळी साजरी करण्याचा समाजापुढे, एक आदर्श विचार ठेवण्यात आले. होळीनिमित्त एकमेकांवरती रंग टाकून प्रेम भाव सादर करण्यात आला, यावेळी उपस्थित वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार, व ग्रंथपाल राजू अंजनीकर व मातंग समाजाचे युवा तरुण कार्यकर्ते, व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते होळी सन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0