अकोल्यात बौद्ध मंगल परिणय समितीची प्रभावी बैठक संपन्न.शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे ठराव एकमताने मंजूर.. (अकोला, प्रतिनिधी) दि. १ मार्च २०२६ :धम्म, शिस्त आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संगम अनुभवायला मिळाला तो लेबर कॉलनी, कृषीनगर येथील सम्राट अशोक अभ्यासिका केंद्रात. बुद्ध विहार समन्वय महासंघ अकोला यांच्या वतीने जिल्ह्यातील लग्न लावणारे बुद्धाचार्य, श्रामनेर, उपासक-उपासिका यांची ‘बौद्ध मंगल परिणय समिती’ बैठक अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.समाजसेवक तथा बुद्ध विहार समिती लेबर कॉलनी कृषीनगर अकोला चे अध्यक्ष देवरावजी अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विचारमंथनासोबतच ठोस सामाजिक निर्णय घेण्यात आले.धम्ममार्गाची दिशा देणारे मार्गदर्शन बैठकीचे प्रमुख वक्ते आणि महासंघाचे अध्यक्ष धम्मबोधी डोंगरे सर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून बौद्ध विवाह पद्धतीतील शुद्धता, समयपालन आणि सामाजिक शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. विवाह हा केवळ दोन जीवांचा मिलाफ नसून तो समाजातील नैतिक मूल्यांचा उत्सव आहे, असे सांगत त्यांनी सर्व बुद्धाचार्यांना संघटित व जबाबदार भूमिका घेण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकुंद रावजी तायडे, पोलीस अधिकारी बाबुराव वानखडे, भारतीय बौद्ध महासभा अकोला चे संस्कार विभाग उपाध्यक्ष भाऊसाहेब थोरात, माजी शहराध्यक्ष गोरखनाथजी वानखडे, माजी महासचिव संतोषभाऊ रायबोले, तसेच बाळापूर तालुका अध्यक्ष राहुलभाऊ इंगळे यांची उपस्थिती कार्यक्रमास अधिक बळ देणारी ठरली. जिल्हाभरातील उपासक-उपासिकांची उत्स्फूर्त उपस्थिती कुटासा, कपिलेश्वर, पैलपाडा, खडका, दाबकी, कानशिवणी, शिवणी, मोठी उमरी, न्यू भीमनगर आदी गावांमधून आलेले ज्येष्ठ कवी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघाच्या प्रतिनिधींसह तब्बल २०० ते २५० उपासक-उपासिका या बैठकीस उपस्थित होते.कार्यक्रमात अनेक मान्यवरांना बुद्ध विहार समिती लेबर कॉलनी कृषीनगरचे अध्यक्ष देवरावजी अहिर यांच्या हस्ते संयोजक म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या कार्याची पावतीच मानली गेली.सामाजिक भान जपणारे ठराव एकमताने मंजूरबैठकीत वाचून दाखविण्यात आलेले आणि सर्वानुमते मंजूर झालेले ठराव समाजातील अनुशासन आणि नैतिकतेचा ध्वज उंचावणारे ठरले वेळेवर न लागणारे विवाह बुद्धाचार्य, श्रामनेर, उपासक-उपासिका यांनी लावू नयेत.नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी विलंब झाल्यास समंजस निर्णय घ्यावा.सर्व विवाह भारतीय बौद्ध महासभा यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने व पांढऱ्या वस्त्रांमध्येच संपन्न करावेत.गावातील किंवा बौद्ध वस्तीत अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.दारू पिऊन कोणालाही विहारात प्रवेश देऊ नये.सर्व निर्णय कायदेशीर आणि शांततेच्या मार्गानेच राबवावेत, संयोजकांकडून शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.या ठरावांमुळे बौद्ध विवाह पद्धतीला शिस्त, सात्विकता आणि सामाजिक सजगतेची नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.संघटनबांधणीसाठी परिश्रमकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी प्रेमसागर शेंडे, संदीपभाऊ इंगळे, प्रमोदभाऊ वानखडे, साहेबरावजी मोरडे, नाना किरतकार, मोतीरामजी गायकवाड, रविभाऊ जंजाळ, दिवाकर सदाशिव यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतरावजी अवचार यांनी केले, तर सूत्रसंचालन मा. पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे यांनी प्रभावी शैलीत पार पाडले. आभार प्रदर्शन साहेबरावजी मोरडे सर यांनी व्यक्त केले. सरनथ्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.धम्मसंस्कारांचा दीप प्रज्वलित ही बैठक केवळ औपचारिक नव्हती; ती होती धम्मसंस्कारांची पुनःप्रतीज्ञा.समाजातील विवाहसंस्थेला शिस्त, सात्विकता आणि कायदेशीरतेची चौकट देत बौद्ध समाजाने स्वतःच्या संघटनशक्तीचे दर्शन घडविले.अकोल्याच्या भूमीतून निघालेला हा धम्मसंस्काराचा संदेश जिल्हाभर पसरून समाजजीवन अधिक सुसंस्कृत व सजग करण्याची दिशा देईल, यात शंका नाही. अशी माहिती समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.प्रकाशनार्थ......माननीय, संपादक /पत्रकार अकोला.

अकोल्यात बौद्ध मंगल परिणय समितीची प्रभावी बैठक संपन्न.शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे ठराव एकमताने मंजूर..                                                                 
Previous Post Next Post