*ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यरत**@)तहसीलदार माचेवाड यांचे प्रतिपादन* (मानवत / प्रतिनिधी.)————————शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी, त्यांच्या अधिकारांची व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तसेच ग्राहकांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना कार्यरत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी केले. येथील तहसील कार्यालयात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मानवत शाखेच्या वतीनेजागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्र कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सदरील चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार, शहराध्यक्ष श्याम झाडगावकर हे उपस्थित होते. चर्चासत्राच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत चे शहर सचिव प्रसाद जोशी यांनी त्यांच्या भाषणात ग्राहक पंचायतची स्थापना त्याचे उद्दिष्ट, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा गिरी यांनी तर आभार प्रदर्शन पुरवठा विभागाच्या वतीने सूरश्री मुदगलकर यांनी केले. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे डॉ विजयकुमार कहेकर, प्रकाश करपे, जयप्रकाश मिटकरी, प्रा गजानन आंबेकर, अनंत बंडे, संजय महात्मे, सूर्यकांत माळवदे, दिपक दुगाने, ऍड आकाश कडतन व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0

