पाडळसे शिवपुराण कथेच्या आयोजकांचा क्रूर चेहरा; वीटभट्टीवर २५ मजूर कुटुंबासह उपाशी! धर्माचा इव्हेंट करणाऱ्या रतन धोंडू भोईच्या भट्टीवर मजुरांवर अत्याचार; मजुरांनी ११२ नंबर फिरवून मागितली पोलिसांची मदत


 पाडळसे (ता. यावल)  लाखो भाविकांच्या उपस्थितीत 'शिवमहापुराण' कथेचा सोहळा रंगला असताना, दुसरीकडे या कथेचे मुख्य आयोजक रतन धोंडू भोई. विजय रतन भोई आणि अजय रतन भोई यांच्या मालकीच्या चिमणी वीटभट्टीवर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगड येथून रोजगारासाठी आलेल्या २० ते २५ मजुरांना गेल्या महिन्याभरापासून मजुरी देण्यात आलेली नाही, शिवाय गेल्या तीन-चार दिवसांपासून ही कुटुंबे आणि त्यांची लहान मुले उपाशी असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.मजुरांचा आक्रोश आणि पोलिसांत धाव मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील हे मजूर पाडळसे येथील या आयोजकांच्या वीटभट्टीवर काम करत आहेत. करारानुसार त्यांना वेळेवर मजुरी मिळणे अपेक्षित होते, मात्र महिना उलटूनही हातात दमडी पडली नाही. उपासमार असह्य झाल्याने आणि मालकांकडून कोणतीही दाद मिळत नसल्याने, अखेर मजुरांनी ११२' (Emergency Response Support System) नंबर डायल करून पोलिसांना आपली व्यथा कळवली. कथेचा झगमगाट, मजुरांच्या घरात अंधार!**आयोजक सध्या कथास्थळी येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईत आणि धार्मिकतेच्या प्रदर्शनात मग्न आहेत. मात्र, त्यांच्याच वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या चुली गेल्या चार दिवसांपासून पेटलेल्या नाहीत. "आम्ही जगाचा पोशिंदा असलेल्या महादेवाची कथा ऐकतोय, पण आमच्याच मालकाने आम्हाला अन्नावाचून मारले आहे," अशी आर्त हाक मजुरांनी दिली आहे. प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची गर वेठबिगारीचा संशय: मजुरांना मजुरी न देणे आणि त्यांना डांबून ठेवल्यासारखी वागणूक देणे हा 'वेठबिगारी' कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकतो. श्रम विभागाचे दुर्लक्ष: कामगार विभागाने या मजुरांच्या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन त्यांची थकीत मजुरी मिळवून देणे आवश्यक आहे.
Previous Post Next Post