देगलूर तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरीा. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात मोठ्या,उत्साहामध्ये रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला, मुस्लिम धर्मामधील रमजान हा सर्वात मोठा सण असून,या सणात एक महिना प्रत्येक मुस्लिम बांधवांनी उपवास ठेवून अल्लाची प्रार्थना करतात,व समता, बंधुत्व व एकात्मता, राहण्याचे एक आदर्श विचार या महिन्यात पाळले जातात. गोरगरीब सामान्य माणसाच्या घरात सुखी,समृद्धी,व ज्ञानाची वाढ व्हावी आशि आल्हा कडे प्रार्थना करण्याचे कार्य,या महिन्यांमध्ये उपवास ठेवून साजरी केला जातो,मोठ्या उत्साहात हा रमजान ईद साजरा केला जातो आज रमजान दिनानिमित्त ग्रामीण भागातील, व शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त एकमेकाला गळाभेट करून एकमेकांचे आदर्श,व एकमेकाचे सन्मान ठेवण्याचं, व सर्व समभाव हा उद्देशाने आज देगलूर तालुक्यात मोठ्या उत्साहात,मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केला आहे. शेवाळा नवीन येथील मुस्लिम बांधवांनी, उंच माळराणावरती, असलेल्या ईदगा येथे सर्व समाज उपस्थिती,राहून नमाज पठण करून एकमेकांना गळा भेट घेऊन, एकात्मतेचा संदेश देऊन एकमेकांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देऊन मोठया उत्साहात, रमजान ईद साजरी केला, व देगलूर तालुक्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

