*शिक्षणाधिकारी, श्रीमती सविताताई बिरगे यांची राजर्षी शाहू महाविद्यालयास भेट** (मानवत ( अनिल चव्हाण )**{ मीडिया पोलिस टाईम. }*————————————मानवत येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयास माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सविताताई बिरगे यांनी भेट देऊन विद्यालयातील विविध उपक्रमाची केली पाहणी.सविस्तर वृत्त असे की,मानवत येथील राजर्षी शाहू महाविद्यालयास आज माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी राजर्षि शाहू कनिष्ठ महाविद्यालयास भेट देत शैक्षणिक कामकाजाचा आढावा जाणून घेतला यावेळी पाहणी दरम्यान महाविद्यालयातील शिस्तबद्ध कार्यपद्धती गुणवत्ता पूर्ण अध्यापन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नीट आय. आय. टी. फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी मन मोकळे पणानी संवाद साधला व तसेच या उपक्रमाची विशेष दखल घेतली. याच दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष पवार यांनी यावेळी सविस्तर माहिती देतांनी सांगितले की गेल्या पाच वर्षा पासून आम्ही फाउंडेशनचे क्लासेस घेत आहोत या क्लासेसचा विद्यार्थी यावर्षी jee साठी पात्र झालेला आहे असे अशी माहीती यावेळी संतोष पवार यांनी दिली.यावेळी शिक्षणाधिकारी यांनी विद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सातत्य पूर्ण नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे असे यावेळी शिक्षकांशी हितगूज साधतांना मत व्यक्त केले. यावेळी मानवत गट साधन केंद्राचे समन्वयक जलसिंगे सर तसेच यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतलिंग काळे संचालक आत्मलिंग काजळे प्राचार्य संतोष पवार उपप्राचार्य शिवशक्ती काजळे प्रा अनुसयाताई काळे प्रा गोविंद रासवे प्रा काशिनाथ जाधव प्रा शिवराज गिराम प्रवीण पवार प्रा गोविंद पाटील प्रा अण्णासाहेब कांबळे दैवशालाताई शिरसागर श्रीमती सुनिताताई दमाने आदींची यावेळी उपस्थिती होती.***

शिक्षणाधिकारी, श्रीमती सविताताई बिरगे यांची राजर्षी शाहू महाविद्यालयास भेट**                                                            
Previous Post Next Post