🚩🚩जय महाराष्ट्र, जय शिवराय🚩🚩*
हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो.मकसुद बावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे माननीय *श्री. सतीश धोबे (उपजिल्हाप्रमुख) तसेच श्री. मनीष देवडे (तालुकाप्रमुख, हिंगणघाट) यांच्या प्रमुख उपस्थितीत, सध्या जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर *हिंगणघाट शहर व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा खाजगी शाळा तसेच अंगणवाडी तात्पुरत्या बंद ठेवण्याबाबत* निवेदन देण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माननीय गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना कळविण्यात आले की, सध्या वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. *हवामान विभागाने देखील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेबाबत इशारा दिला असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्याचाही समावेश आहे*. या परिस्थितीत शासनही गंभीर असून लहान *मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने* तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने, *तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद,नगर परिषद तसेच खाजगी शाळांना उष्णतेच्या तीव्रतेमुळे शाळेचा वेळ कमी करण्याच्या सूचना द्याव्यात*. तसेच काही शाळा व अंगणवाड्या तात्पुरत्या बंद ठेवण्याबाबत सक्तीचे आदेश जारी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून खाजगी शाळेचा वेळ सकाळी ९ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याची सूचना देण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
याबाबत हिंगणघाट शहरातील काही कॉन्व्हेंट(खाजगी) शाळांना सूचना देऊन त्या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत. *लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी*, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना पक्षाचे *उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने,गजानन काटवले, शितल चौधरी, शंकर मोहम्मारे, सचिन पोटदुखे, अनंता गलांडे प्रशांत सुपारे, प्रशांत कांबळे, अमोल वादाफळे,विलास चौधरी, कपिल आखाडे,प्रशांत आवारी* तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

