भामलवाडी ग्रामपंचायत ची कौतुकास्पद कामगिरी.
शाळेतील लहान मुलांचा व नागरिकांचा विचार करत केली दमदार कामगिरी
भामलवाडी तालुका रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव
रावेर.तालुक्यातील भामलवाडी शिंगाडी ग्रामपंचायतची मोठी कामगिरी पाहावयास मिळाली आहे ,भामलवाडी येथील अनेक वर्षांपूर्वीची विहीर १००/१२० फूट होती ती विहीर धोकादायक असल्याने काही दुर्घटना घडून येऊ नये म्हणून सतत भामलवाडीतील नागरिक ग्रामपंचायत सिंगाडी भामलवाडी यांच्या कानावरती हा विहीरीचा विषय नेहमी निघत होता,तसेच ह्या विहीरीच्या बाजूला मराठी मुलांची शाळा सुरू असायचीआणि त्या परिसरात लहान लहान मुले मुली त्या आवारात खेळायचे म्हणून भामलवाडी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतला वारंवार सांगून विनंतीकरुन विहीर बुजण्याचा निर्णय घेतला व ग्रामपंचायत सिंगाडी , भामलवाडी ग्रुप असल्याने तात्काळ विहीर बुजण्यास सुरुवात केली व विहिरीचे काम दोन ते तीन दिवसात पूर्ण केले गावातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ह्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल ग्रामपंचायतच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार मानले..

