चिंचोली साई दुध डेअरी उद्घाटन प्रसंगी मारोती पाटील कवळे यांचे मार्गदर्शन...

चिंचोली साई दुध डेअरी उद्घाटन प्रसंगी मारोती पाटील कवळे यांचे मार्गदर्शन...

पिंजारी माहेमूद
 तालुका प्रतिनिधी: देगलूर 

चिंचोली (कंधार)बि.न.स  साई दुध डेअरीचे उद्घाघाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारोती पाटील कवळे सर (वाघलवाडा चेअरमन) उपस्थित होते. त्यांनी नवतरुण मुलांना व्यवसायात उतरून आपला भविष्य घडवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर, आपल्या भागातील मन्याड नदी ही या भागासाठी देणगी आहे आणि यामुळे दूध व्यवसायातील पशूधारकांना चारा व पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे सांगितले. यामुळे गरजुंना रोजगार मिळवण्याची संधी मिळेल.
मारोती पाटील कवळे सर यांनी यावेळी सांगितले की, जर गरजु असतील तर आमच्या संस्थेमार्फत व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जाईल. त्यांचा हा विश्वासवर्धक संदेश उपस्थितांना दिला.
उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उपस्थित म्हणून विजय धोंडगे (माजी सदस्य, जिल्हा परिषद, कौठा), बबन गोविंद पापुलवाड, विठ्ठलेश्वर दूध डेअरी बाचोटी यांचे मार्गदर्शन मिळाले. यांनी देखील उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच, मॅनेजर कवतुवार, सुपरवाझर कपनावारे आणि दुध डेअरीचे व्यवस्थापक प्रसाद तुकाराम कौसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्यात गावातील नागरिकांचा उत्साह दिसून आला आणि या दुध डेअरीमुळे स्थानिक लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Previous Post Next Post