गंजगाव येथे श्री. संत भीमा भोई यांची 176 वी जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
मारोती एडकेवार
नांदेड : भोई समाजाचे थोर श्री. संत भीमा भोई यांची 176 वी जयंती गंजगाव मध्ये प्रथमच उत्साहात साजरी करण्यात आली देवांनी सुद्धा भारत भूमीवरच जन्म घेतला ही देवभूमीच आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. संत हे देवच मानले जातात. आपल्या भारत देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे *श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत नामदेव, श्री संत तुकाराम, श्री संत एकनाथ आणि श्री संत समर्थ रामदास* हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्र धर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. तसेच *श्री. संत भीमा भोई* यांचे ही देखील उत्तम संदेश दिले चाहे मुझे नरक मिले लेकिन जगत का कल्याण हो त्यांचे चांगले कार्य व आपल्या महान कृत्यांद्वारे समाजात एक नवीन विचार आणि विचारसरणी जागृत केली.
विविध समाजातील संतांनी देखील समाजामध्ये जागृतीचे चांगले काम केले.
भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांच्या 176 व्या जयंतीनिमित्त गावातील श्री संत भीमा भोई समाज मंदिर परिसरातील भोईराज येथे माजी जिल्हा परिषद सदस्य ठकरवाड गणेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले
येथील भोईराज मित्र मंडळातर्फे श्री संत भीमा भोई यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअनुषंगाने गंजगावनगरीचे प्राध्यापक डॉक्टर राजु कोंडेकर आदिवासी विभागातील वस्तीगृह अधीक्षक साईनाथ ओनरवाड यांनी आपल्या भाषनातुन सर्व समाजबांधवांना शिक्षनाचे महत्व सांगून शिक्षणा शिवाय आपला समाज मुख्य प्रवाहात येत नाही सर्व पालकानी मुलांना शिकवा याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आदिवासी विभागातील वस्तीगृह अधीक्षक साईनाथ ओनरवाड हे बोलत होते कार्यक्रमाला माजी सरपंच प्रतिनिधी माधवराव घाटे हणमंत कनशेटे भुजग पाटील माणिकराव बासरे मारोती घाटे मारोती साखरे माधवराव पाटील गोविंद पाटील आरिफ पठान अनिता गंजगावकर भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ राजू ओलोटकर यादवराव पणदिलवाड डुबुकवाड बालाजी नामदेव पंदीलवारड गणेश भट्टेवाड बालाजी आरगुलवार विजय सरसमकर श्रीकांत टोकलवाड विठ्ठल आलगुलवाड यांच्या हास्ते भीमा भोई या संघटनेच्या पाटीचे आनावरण करण्यात आले संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर राजाभोई ओनरवाड उपाध्यक्ष बळीराम सयाजी ओनरवाड सचिव लक्ष्मण पोशटी ओनरवाड नरसिंग ओनरवाड सायलू ओनरवाड यादव ओनरवाड यांच्या सह गावातील सर्व धर्माचे नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुमार सायलू ओनरवाड यांनी केले तर आभार रामलू ओनरवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोईराज मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले

