सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू चा 56 वा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात साजरा

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू चा 56 वा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात साजरा

छत्रपती संभाजी नगर क्राईम उपसंपादक राजु साठे 

 सीटू संघटनेची स्थापना 30 मे सन 1970 रोजी बी टी रणदिवे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संघटना स्थापन झाली पी राममुर्ती यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे ,छत्रपती संभाजीनगर शहीद भगतसिंग हायस्कूल वाळूज येथे व्याख्यानाचा कार्यक्रम लक्ष्मण साक्रुडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पदाधिकारी कॉ किरण मोघे या उपस्थित होत्या, राज्य उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी संघटनेचे कार्यकाळ प्रास्ताविक केले, राज्य कौन्सिल सदस्य कॉ अजय भवलकर यांनी आपले विचार मांडून शुभेच्छा पर संदेश दिला,कॉ  किरण मोघे यांनी सीटू संघटनेचे कार्य उद्देश व घटना याबद्दल कामगारांना  मार्गदर्शन केले,भारत स्वातंत्र्य पुर्वी ही आपण होतो व आत्ता पण आपण चळवळीत आहोत,देशातील संघटीत व असंघटीत, योजना कर्मचाऱ्यांरी क्षेत्रातील कामगार वर्गाची परिस्थिती फारशी चांगली व स्थिर नाही क्रयशक्ती कमी होत चालली आहे भांडवलदार नफा वाढवण्यासाठी कामगारांना कमी वेतनावर काम करून घेत आहे ऑटोमेशन आले आहे पर्मनंट नोकरी मिळत नाही बेरोजगारी वाढत आहे कंत्राटीकरण खाजगीकरण दिवसेंदिवस वाढत आहे कामगारावर महागाई संकट ओढवले आहे कित्येक ठिकाणी कामगारांना किमान वेतन सुद्धा दिले जात नाही याचे उदाहरण एनसीआर राज्यामधे आपण पाहिले आहे सीटू संघटनेने कामगारांच्या हक्कासाठी न्यायासाठी , अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध रस्त्यावरील लढाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे ,नवीन श्रमसंहितामुळे कामगार वर्ग संघटित व असंघटित धोक्यात आला आहे योजना कर्मचाऱ्यांना कायम करून घेतले जात नाही तुटपुंजा मानधनावर सरकार काम करवून घेत आहे असंघटित व योजना कामगारांना मुलभूत सुविधा भागविण्यासाठी कमीत कमी किमान वेतन 30 हजार रुपये मिळावे यासाठी सीटू संघटना सातत्याने रस्त्यावर उतरून लढाई तीव्र आंदोलन करत आहे किमान वेतन सुधारणा कायदा असून त्याची अंमलबजावणी होत नाही ,एकजूट आणि संघर्ष याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आपण संघटन वाढीसाठी जेथे आपण पोहोचलो नाही तेथे आपण पोहोचावे हे संघटनेचे घोषवाक्य कायम स्मरणात ठेवून शेवटच्या घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम सीटू संघटना सातत्याने पुढे येऊन करत आहे ते पुढे घेऊन जावे व आपल्या विविध मागण्यासाठी दि 1जुन  ते 3 जुन 26 रोजी  मुंबई आझाद मैदान येथे राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश ठिय्या जनआंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात आपण सहभागी व्हावे असे व्याख्यान पर संदेश कॉ किरण मोघे यांनी दिला आहे या कार्यक्रमांमध्ये जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड साक्रुडकर यांनी अध्यक्षीय समारोप भाषण केले,या कार्यक्रमात कॉ राजेंद्र देवकर,कॉ बस्वराज पटणे ,कॉ सतीश कुलकर्णी, कॉ प्रदीप गाढवे,कॉ संजय गोकुंडे,कॉ विश्वनाथ शेळके,कॉ रमेश हाके,कॉ ज्योती भोसले,कॉ शेख चांद,कॉ गजानन बुलबुले,कॉ उमेश जाधव,कॉ शेख मिराज,कॉ साहेबराव मगर,कॉ बालाजी तांबे,कॉ संदीप गाजरे आरोग्य कर्मचारी कॉ. शशिकला खंडाळे, कॉ. रंजना भुते, कॉ. माणबी पठाण, कॉ राज्यश्री सिखारे, कॉ उजवला गोमटे, कॉ. सुनीता जैस्वाल. कॉ. सफिया बेग,कंपनीतील सर्व युनियन प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर जिल्हा कमिटी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते कॉ गोरखनाथ राठोड यांनी सर्वांचे आभार मानले..                                                                            वार्ता: कॉ बस्वराज पटणे ,सीटू राज्य कौन्सिल सदस्य, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेक्रेटरी मो नं 9021083871..
Previous Post Next Post