वर्धा जिल्ह्यात आपदा मित्र व सखी प्रशिक्षण यशस्वी बारा दिवसांचे निवासी प्रशिक्षणाचा समारोप**DDMU शुभम घोरपडे यांच्या मार्गदर्शनात १२ दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न.*

*वर्धा जिल्ह्यात आपदा मित्र व सखी प्रशिक्षण यशस्वी बारा दिवसांचे निवासी प्रशिक्षणाचा समारोप*

*DDMU शुभम घोरपडे यांच्या मार्गदर्शनात १२ दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न.*


विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा 

 वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, देवळी, वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट या तालुक्यातून आलेल्या युवक युवती, महिला, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, महसूल विभागातील तलाठी, आरोग्य खात्यातील डॉक्टर, अग्निशामक दलातील फायर फायटर, विद्यार्थी, पत्रकार व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अश्या विविध क्षेत्रातील प्रशिक्षणार्थ्याना आपदा मित्र व सखी प्रशिक्षण यशस्वीरित्या देण्यात आले  हे प्रशिक्षण पूर्ण बारा दिवसांची निवासी स्वरूपाचे होते. 
वर्धा जिल्ह्याचे DDMU शुभम घोरपडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनात हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
 प्रशिक्षण काळात चहा नाष्टा जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था शासकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणी करण्यात आली होती आपत्ती व्यवस्थापन आपत्ती काळात लोकांची सुरक्षित रेस्क्यू कसे करावे पूर इमारत कोसळणे आदी परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याची  प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले, पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या किंवा अडकलेले लोकांना कसे रेस्क्यू करून बाहेर काढणार याची ट्रेनिंग प्रत्यक्ष बोटिंग करून टीम एल शेप व्ही शेप तयार करून थेरी व प्रॅक्टिकल च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करून तयार करण्यात आले तसेच विविध प्रकारच्या दोरीचे प्रकार व गाठी कशा कराव्यात याची सुद्धा तासिका घेण्यात आल्या.
 विषारी बिनविषारी व निमविषारी सापाचे प्रकार व त्यावरील उपाय योजना सुद्धा माहिती प्रोजेक्टर वर डिजिटल माध्यमाद्वारे सखोल माहिती देण्यात आली.
सीपीआर कसं करावं व प्राण कसे वाचवावे यावर प्रथमोपचार करून कृतीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले 28 मे 2026 रोजी प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी लेखी परीक्षा घेण्यात आली त्यानंतर निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशिक्षण देणारे मुख्य प्रशिक्षक श्री. ओम सपार, बजरंग होटकर, शकुंतला राय, मैथिली जाधव प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. 
यावेळी मोठ्या संख्येने आपदा मित्र व सखी प्रशिक्षणार्थी तसेच वर्धा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे सदस्य उपस्थित होते. काही आपदा मित्र व सखी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व प्रशिक्षनार्थी यांचा शपथविधी घेऊन प्रार्थना करण्यात आली उत्साह पूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात बारा दिवसाचा प्रशिक्षणाचा निरोप समारंभ संपन्न झाला.
Previous Post Next Post