अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई.

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई.

महेश निमसटकर (भद्रावती चंद्रपूर)
कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य 


 भद्रावती, दि.३१ :अवैध गौण खनिज भरारी पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे  अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. 
सदर कारवाई विजासन येथे चारगाव घाट येथून भरून येत असलेल्या एक ब्रास  भरून असलेल्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाच्या ग्राम महसूल अधिकारी अनिल दडमल ,यांनी दि.२९ रोज शुक्रवार रात्री १०.३०  वाजता च्या दरम्यान सदर कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.34 ab 0450 व ट्रॉली क्रमांक एम. एच एच Ab 9256  या वर्णनाच्या वाहनातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर हा  भीमराव गजानन ठमके राहणार गौराळा भद्रावती यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे रेतीच्या कोणत्याही प्रकारच्या परवाना नसल्याबाबत आढळले सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसूल मंडळ अधिकारी अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के ,यांनी सदरची कारवाई पार पाडली. यामुळे किरकोळ रेती तस्कराचे धाबे दणाणले असले तरी मोठे मासे कार्यवाही पासून अलिप्त आहेत.
Previous Post Next Post