यावल भुसावल मार्गावर अंजाळे घाटावर चार चाकी व मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

यावल भुसावल मार्गावर अंजाळे घाटावर चार चाकी व मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

जळगाव जिल्हा खानदेश संपादक प्रवीण मेघे

 दि30 मे 26 शनिवार यावल भुसावल मार्गावरील अंजाळे घाटावर आज दिनांक 30 मे शनिवार रोजी चार चाकी वाहनाने मोटर सायकल धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की लखन जोहरी वय वर्ष    32 राहणार यावल हे मोटार सायकल क्रमांक एम एच   19 डी यु  6521 या दुचाकी वाहनाने भुसावल कडून यावल कडे येत असताना यावल होऊन भुसावळ कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी डंपर वाहन क्रमांक एम एच ने एम एच  19 सिवाय 6651 या वाहनाने यावल कडे येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक  19 डी यु  6521 या दुचाकी मोटार सायकल ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात लखन अशोक जोहरी वय  32 वर्ष राहणार यावल यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर मोटार सायकल वर सोबत असलेल्या  मयताच्या वहिनी अनिता संदीप सिंग जोहरी वय 50 वर्ष या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे या संदर्भात यावल पोलीस ठाण्यांच्या पथकांच्या माध्यमातून अपघातासथळी पंचनामा करण्यात आला असून पोलीस ठाण्यात सदर डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ  धारबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे
Previous Post Next Post