अंधश्रद्धेला आव्हान देणारा झपाटलेला चेहरा : कमलाकर जमदडे भीती, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या अंधारात अडकलेल्या समाजाला जागं करण्यासाठी एखादा माणूस स्वतःच आग बनतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच कमलाकर चंद्रकांत जमदाडे

अंधश्रद्धेला आव्हान देणारा झपाटलेला चेहरा : कमलाकर जमदडे 

भीती, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या अंधारात अडकलेल्या समाजाला जागं करण्यासाठी एखादा माणूस स्वतःच आग बनतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच कमलाकर चंद्रकांत जमदाडे

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 


नांदेड : बिलोली तालुक्यातील रुद्रापूरचा हा साधा मेडिकल चालक पण विचारांनी प्रचंड बंडखोर २०११ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत प्रवेश घेतल्यापासून त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध युद्धच छेडलं आहे.स्मशानात वाढदिवस भीतीचा चक्काचूर २०१४ बिलोली स्मशानभूमी आणि तिथे एका चिमुकलीचा वाढदिवस साजरा
हा प्रकार ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला पण जमदाडे यांनी दाखवून दिलं भूत नाही भीतीच भयानक आहे बहिष्कार, विरोध तरीही थांबले नाहीत समाजाने विरोध केला… बहिष्कार टाकला पण हा माणूस थांबला नाही पत्नी सुरुवातीला सोबत नव्हती पण संघर्ष पाहून तीही पेटली आज दोघं मिळून अंधश्रद्धेविरुद्ध रणांगणात लढतायत प्रयोगांची ताकद अंधश्रद्धेवर थेट वार २०१५ मध्ये लातूर येथे घेतलेलं प्रशिक्षण आणि दगडापूर आश्रमशाळेत पहिला प्रयोग
तो प्रयोग यशस्वी झाला आणि तिथून सुरू झाला विज्ञानाचा स्फोट१५०+
शाळांमध्ये धडक दरवाजे बंद झाल नकार मिळाले पण जमदाडे हटले नाहीत अधिकाऱ्यांना गाठलं परवानगी मिळवली आणि मग सुरू झाला धडाका १५० पेक्षा अधिक शाळांमध्ये प्रयोग हजारो विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार गावोगावी पेटली जागृती १००+ गावांमध्ये कार्यक्रम ग्रामसेवक, सरपंच सहभागी दुर्गा, गणपती, जयंती - सगळीकडे एकच आवाज:अंधश्रद्धा सोडा विज्ञान स्वीकारा उपक्रम नव्हे, थेट आंदोलन फटाके मुक्त दिवाळी होळी लहान करा, पोळी दान करा”द दारूचा नाही, दुधाचा”हे फक्त कार्यक्रम नाहीत हे समाज बदलण्याचे धडाकेबाज आंदोलन आहे
बहिष्काराला उत्तर जिद्दीने
बहिष्कार झाला टोमणे मिळाल पण जमदाडे अधिकच पेटले आज त्यांचा संपूर्ण परिवार वैज्ञानिक झाला आहे एकच संदेशभीती नाही, विज्ञान हवं कमलाकर जमदाडे हे नाव आता केवळ व्यक्ती नाही तर अंधश्रद्धेविरुद्ध उठलेला आवाज आहे देवाच्या नावावर भीती विकणाऱ्यांविरुद्ध, विज्ञानाची मशाल पेटवणारा हा माणूस आहे

Previous Post Next Post