उर्दू प्राथमिक शाळा, पैठण येथे मुख्याध्यापकांची बदली; नव्या मुख्याध्यापकांनी स्वीकारला पदभार

उर्दू प्राथमिक शाळा, पैठण येथे मुख्याध्यापकांची बदली; नव्या मुख्याध्यापकांनी स्वीकारला पदभार

औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी)

अंजुमन इशाअत तालीम ट्रस्टच्या वतीने संचालित उर्दू प्राथमिक शाळा, पैठण येथील मुख्याध्यापक शेख रहेमतुल्लाह सर यांची शासकीय नियमानुसार बदली करण्यात आली. आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शाळेच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या नेतृत्व, परिश्रम आणि समर्पणामुळे शाळेने विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती साधली असून संस्थेला नवी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

यावेळी अंजुमन इशाअत तालीम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अब्दुलगफ्फार कादरी, उपाध्यक्ष सय्यद जिब्रान कादरी, सचिव सय्यद अली कादरी, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शेख रहेमतुल्लाह सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, अब्दुल रहीम सर यांनी उर्दू प्राथमिक शाळा, पैठणचे नवे मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, प्रशासन आणि सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रात आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नव्या मुख्याध्यापकांना पूर्ण सहकार्य करण्याचा तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पितपणे कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Post Next Post