तमलूर येथे दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण,आरोपी संतोष चनप्पा मांडे वर ॲट्रॉसिटी ॲक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल.

तमलूर येथे दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण,आरोपी संतोष चनप्पा मांडे वर ॲट्रॉसिटी ॲक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :देगलूर तालुक्यातील तमलूर येथे घरासमोरील नाली जेसीबीने काढण्यास विरोध केला म्हणून एका दलित कुटुंबाला अत्यंत हीन दर्जाची जातीवाचक शिवीगाळ करत, बेदम मारहाण केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना देगलूर तालुक्यातील तमलूर येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित महिला रेखा लालू वनंजे यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष चनप्पा मांडे याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरासमोर खड्डा पडत असल्याने केला होता विरोध
तामलूर येथील रहिवासी रेखा लालू वनंजे (वय ३५ वर्षे) या २७ जून २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबासह घरात होत्या. याच वेळी गावातील संतोष चनप्पा मांडे हा त्यांच्या घरासमोरील नाली जेसीबीच्या साहाय्याने काढत होता. नाली काढल्यामुळे घरासमोर मोठा खड्डा पडत असल्याने आणि कुटुंबाला येण्या-जाण्यास मोठा त्रास होणार असल्याने रेखा वनंजे यांनी त्याला "इथे नाली काढू नका, आम्हाला त्रास होतो," असे विनंतीवजा सांगितले.तुमची औकात काय?" म्हणत आरोपी संतोष मांडेचा जीवघेणा हल्ला
या साध्या बोलण्याचा राग मनात धरून आरोपी संतोष चनप्पा मांडे याने पीडितेला व तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने महारडगी, धेडघे... हो तुमची औकात काय? जास्त बोलू नका, नाहीतर तुम्हाला खत्म करून टाकीन,अशी उघड धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपी संतोष मांडे याने रेखा वनंजे यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि उजव्या डोळ्यावर जबर मारहाण करून त्यांना जमिनीवर पाडले व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू
या भ्याड हल्ल्यात रेखा वनंजे व त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांनी देगलूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर देगलूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून आरोपी संतोष चनप्पा मांडे याच्याविरुद्ध रीतसर जबाब नोंदवला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तसेच मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Previous Post Next Post