हिप्परगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे 106 वी जयंती डीजे मुक्त साजरी
साहित्य संविधान दिंडी घेऊन मुख्य रस्त्याने पालखी काढण्यात आले
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली,सकाळी ८:३० वाजता बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे साहेब, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व ठीक 3:00 वाजता साहित्य संविधान दिंडी पालखी सोहळा गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात,आला या पालखीत भारतीय संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, डॉ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा, व फकीरा कादंबरी ठेवून पालखी काढण्यात आले, व महापुरुषांचे विचारांचे फलक वाचनातील विद्यार्थ्यांनी दर्शविली आहे सायंकाळी, ठीक 8:30 वाजता वाचनालयातील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेश पाटील मरखले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन पाटील, समाज कल्याण अधिकारी अनिल सायबु अंजनीकर परभणी,हिप्पारगा थाडीचे सरपंच इनामदार रहेबर, उपसरपंच चंद्राबाई व्यंकट तुकडे, पोलीस पाटील शंकराप्पा मठपती, माजी सरपंच साहेबराव अंजनीकर, माजी सरपंच मियाँ पटेल,सर्व ग्रामपंचायत सदस्य, मातंग समाजा अध्यक्ष भगवान एडकेवार, वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार, वाचनालय सचिव राजू भुमाजी अंजनीकर,ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, जयंती मंडळाचे अध्यक्ष अजय साहेबराव अंजनीकर, उपाध्यक्ष शिवाजी भगवान एडकेवार, दीपक एडकेवार, सुनील अंजनीकर,साहेबराव एडकेवार, अविनाश लघुळकर, व समाजातील समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

