मनोज जरांगे यांचे आंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू; सरकारला आता पळवाट काढायला जागा नाही -जरांगे पाटीलमराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार?; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक, धुळे सोलापूर मार्गावर रास्तारोकोचा प्रयत्न, सोलापूरात आंदोलकांचा मंत्र्याच्या गाडीचा पाठलाग, धाराशिवमध्ये टोलनाका बंद, कोल्हापुरात सकल मराठा समाजाचे ऐतिहासिक दसरा चौकात निदर्शने
आंतरवाली(सराटी)/प्रशांत बाफना : जिल्हा संपादक
मराठा आरक्षणाच्या आंमलबजावणीसाठीच्या विविध मागण्यांसाठी मराठा आक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शनिवारी (दि.29) आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले. मागील तीन वर्षात जरांगे पाटील यांचे हे 11 व्या वेळचे आंदोलन आहे. मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी आता हे निर्णायक आंदोलन असल्याचं सांगत जरांगे पाटील म्हणाले की सरकारला आता पळवाट काढायला जागा नाही. त्यासाठी सरकारने आता आंमलबजावणी द्यावी अन्यथा मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंतरवाली येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव शुक्रवारी (दि.28) पासूनच आंतरवालीच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. सायंकाळपासूनच आंतरवाली येथे गर्दी झाली होती. पहाटे आंतरवाली गावचा परिसरात सर्वत्र गर्दी उसळली. जरांगे पाटील यांनी सकाळी 11:00 वाजताच्या दरम्यान आंदोलनस्थळी येवून पत्रकार परिषद घेत उपोषण सुरू केले.
राज्यभरातून पाठिंबा देण्यासाठी येणार्या समाजबांधवांच्या सेवेसाठी गोदापट्यातील गावकर्यांनी जागोजाग जेवनावळ, चहा- पाणी वाटपाचे स्टॉल लावले. मराठा सेवकांचे जथ्ये तैनातीत असून आंतरवालीत येणार्या नागरिकांची आपुलकीचे विचारपूस करून त्यांची सेवा करत आहेत.
सायंकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा सरकारवर निशाना साधत मोठी घोषणा केली. सरकारला आता पळवाट काढायला जागा शिल्लक राहिलेली नाही. हे आंदोलन निणार्यक यासाठी आहे की, हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र कसे देणार, नोंदीनुसार दिलेल्या प्रमाणपत्रांच्या जात वैधता पडताळण्या का रखडल्या, नोंदीप्रमाणे मिळालेल्या पडताळण्या फेटाळल्या का?, मराठा आरक्षण आंदोलनात शहिदांच्या कुटुंबीयांना नोकर्या का दिल्या नाहीत, आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले राज्यभरातील गुन्हे मागे का घेतले नाहीत. आंदोलनादरम्यान दिलेल्या अश्वासनांसाठी तीन वर्षाचा वेळ दिला मात्र आंमलबजाणी का नाही? असे विविध प्रश्न उपस्थित करत आता जे काही होईल ते आंदोलनाच्या ठिाकणी. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही सरकारने आंतरवाली सराटीमध्ये येवून मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, आता अश्वासन चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
येत्या 12 सप्टेंबर पर्यंत सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर राज्यभरातील मराठा मुंबईच्या दिशेने कूच करेल. मुंबईतील मराठ्यांनी तयारीत रहावे असे अवाहन करत आता हा निणार्यक लढा आहे मराठ्यांनी घरात बसू नये आंतरदवालीच्या दिशेने येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
धुळे- सोलापूर मार्गावर रास्ता रोकोचा प्रयत्न: आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेला समाज बांधव आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. वडिगोद्री (जि. जालना) येथे धुळे- सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी अचानक रास्तारोकोचा प्रयत्न केला. आंतरवाली सराटीकडे जाणार्या मार्गावरून आंदोलक अचानक वडिगोद्री येथे वे ब्रिजवर गोळा झाले महामार्गावर दुतर्फा ठाणमांडून रास्तारोको सुरू केला. पोलिस प्रशासाने आंदोलकांची समजूत काढली आणि आंदोलकांना आंतरवालीच्यवा दिशेने जाण्याचा सल्ला दिला. यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
धाराशिवमध्ये टोल नाका बंद पाडला: धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजच्या वतिने आंतरवाली सराटी येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर, रिक्षा, कार च्या रॅल्या काढण्यात आल्या. वाहनांची रॅली धाराशिव येथील धुळे- सोलापूर मार्गावरील टोलनाक्यावर येताच आंदोलकांनी शेकडो वाहनं आडवी लावून टोल नाका बंद केला. घोषणाबाजी करत आंदोलनकांनी टोलनाका बंद केल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगाल लागल्या होत्या.
कोल्हापूरात सकल मराठा समाजाचा निदर्शन, पठिंबा: कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वितने ऐतिहासिक दसरा चौकात निदर्शन करत आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिबा दिला. सरकारने राज्यातील मराठ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येवू द्यायला नको होती, तात्काळ त्यांच्या मागण्यांची आंमलबजाणी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केल.
मराठा आंदोलकाचा ह्रदय विकाराने मृत्यू : आंतरवाली सराटी येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या केज तालुक्यातील सुग्रीव बाप्पू शिंदे रा. नांदुरघाट (जि. बीड) यांचा गेवराई जवळ ह्रद्य विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सुग्रीव शिंदे आपल्या सहकार्यांसमवेत पिकअपने आंतरवालीच्या दिशेने निघाले होते. गेवराई (जि. बीड) येथे प्रवासादरम्यान त्यांना अचानक ह्रद्यविकाराचा तिव्र झटका आला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला

