संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळाच्या तथा* *गोर बंजारा तिज उत्सव समिती* समाजाचा पारंपरिक 'तीज उत्सव' आंबिवलीत उत्साहात संपन्न;

संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळाच्या तथा*
 *गोर बंजारा तिज उत्सव समिती*
       समाजाचा पारंपरिक 'तीज उत्सव' आंबिवलीत उत्साहात संपन्न; 

आंबिवली मुंबई जिल्हा उपसंपादक कृष्णा पवार

समाज बांधवांची मोठी उपस्थिती
गोर बंजारा समाजाच्या संस्कृती,अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेला पारंपरिक 'तीज उत्सव व कौटुंबिक स्नेह मेळावा' आंबिवली कल्याण पश्चिम येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
    तसेच बंजारा संस्कृतीत तीज या सणाला अत्यंत पवित्र स्थान आहे. हा सण निसर्गाची पूजा आणि धरतीच्या सुपीकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 
      या उत्सवाची सुरुवात आंबिवली येथील समाज बांधव श्री. पुरणसिंग रतन राठोड नायक यांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने 
       "तीज पेरणी" करून करण्यात आली. बंजारा समाजातील महिला आणि मुलींनी टोपलीत गव्हाची पेरणी करून ९ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा प्रारंभ केला
या कार्यक्रमाला आंबिवली कल्याण, ठाणे आणि परिसरातील गोर बंजारा समाज बांधव, महिला मंडळ व युवक मंडळाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सर्व समाज बांधव एकत्र आल्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. 'जय सेवालाल' आणि 'एक बंजारा - लाख बंजारा' च्या घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोर बंजारा तीज उत्सव समिती, आंबिवली कल्याण पश्चिम च्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रमुख उपस्थिती व संयोजन:
 * श्री. पुरणसिंग राठोड (नायक)
 * श्री. कपुरचंद पवार (कारभारी)
 * श्री. थानसिंग राठोड (तात्पुरता/कारभारी)
 * श्री. अंबादास पंडित राठोड (अध्यक्ष)
**श्री कृष्णा पुरणदास पवार (पत्रकार )**
श्री सुनील बद्रीनाथ जाधव (शासकीय अधिकारी )
श्री ईश्वर विश्राम राठोड 
 * गोर बंजारा तीज उत्सव समिती,आंबिवली.
कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडल्याबद्दल आयोजकांनी उपस्थित सर्व समाज बांधवांचे, समितीच्या वतीने, आभार मानले व अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम समाप्त झाले असे घोषित करण्यात आले आहे सर्वांच्या मनापासून आभार मानले.जय सेवालाल 🙏🏻
Previous Post Next Post