डांभुर्णि भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार; संशयित आरोपी अटकेत..यावल पोलिसांची कारवाई; देशी कट्टा, जिवंत काडतूस व पिस्तूल जप्त..

डांभुर्णि भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार;  संशयित आरोपी अटकेत..
यावल पोलिसांची कारवाई; देशी कट्टा, जिवंत काडतूस व पिस्तूल जप्त..


(जळगाव जिल्हा ग्रामीण | प्रतिनिधी : फिरोज तडवी)


यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डांभुर्णी येथे भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत फायर करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी कट्टा, जिवंत काडतूस तसेच अन्य शस्त्रसामग्री हस्तगत केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता कोळन्हावी येथील सरपंच विकास उर्फ गोडू जगनाथ साळुंके यांनी डांभुर्णी, ता. यावल येथील चौकात येऊन गावठी कट्ट्यातून हवेत फायर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तपासादरम्यान आरोपीने फायरिंग केल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळावरून फायरिंगमध्ये वापरलेली रिकामी पुंगळी तसेच इतर भौतिक पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासात आरोपी हा कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असून त्याचा कोळन्हावी परिसरात आदर्श हॉटेल, बिअर बार व परमिट रूम असल्याचे समोर आले. तसेच हॉटेल परिसरातील काही मुलांनी मोबाईलवर व्हिडिओ काढून त्याचा गैरवापर केल्याने आरोपीचा त्यांच्याशी वाद झाल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली.
आरोपी विकास उर्फ गोडू जगनाथ साळुंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. त्यानंतर दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १ वाजता त्याला जळगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25(1-ब), 5(1), 25(1)(अ), 25(9), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस नाईक अनिल महाजन, सफाई हेमंत सांगळे, पोहेकॉ रोहिल गणेश, पोका हितेश बागुल, पोका सचिन पाटील, पोका अनिल साळुंखे व चालक पोका संतोष पाटील यांनी सहभाग घेतला.
Previous Post Next Post