प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात प्रस्ताव तयार करा ; पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देशयुवकांना नोकरीवर न घेणाऱ्यांवर कारवाईचे संकेत

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात प्रस्ताव तयार करा ; पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश

युवकांना नोकरीवर न घेणाऱ्यांवर कारवाईचे संकेत

अहिल्यानगर। प्रशांत बाफना

सुपा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्याच्ंया प्रदूषित पाण्याबाबत गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपन्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करावा. स्थानिक युवकांना नोकरीवर न घेणाऱ्या उद्योजकांना पाठशी घालू नका, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

सुपा औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांकडून निर्माण झालेले प्रश्न जाणून घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागरिक, अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आ.काशिनाथ दाते, भाजपाचे अध्यक्ष राहुल शिंदे, प्रा.विश्वनाथ कोरडे, अतिरीक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, औद्योगिक विकास महामंडळाचे गणेश राठोड यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्नांचा आढावा घेऊन समस्या सोडविण्यासाठी काय उपाय करता येईल, यावर बैठकीत भर दिला. कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याची गंभीर समस्या मोठी आहे. अनेक वर्ष पाणी नैसर्गिक स्त्रोतामध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. याबाबत संबधित कंपन्यांची माहिती तातडीने संकलित करून कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

औद्योगिक वसाहतीमधील वाढते अतिक्रमण, रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी निर्धारीत वेळेत अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवावी. सुपा बसस्थानक परिसरात सुध्दा होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय करावा. पावसाळ्यात ड्रेनजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. वाहतूक कोंडी होत असलेल्या कालावधीत जादा संख्येने वाहतूक पोलीस नियुक्त करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिल्या.अनेक उद्योजकांनी बाहेरून कामगार आणल्याने स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब असून भूमिपुत्रांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले. यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष घालून माहिती सादर करावी. पुढील आठवड्यात कामगार आयुक्तांसमवेत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही त्यानी उपस्थित तरूणांना
Previous Post Next Post