बिलोली तालुक्यातील निर्भीड पत्रकार बाबुराव इंगळे यांचे दुःखद निधन
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली गोरगरीब जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकार देशोन्नती बिलोली तालुका प्रतिनिधी बाबुराव इंगळे साहेब,यांचे दुःखद निधन झाले ग्रामीण भागातून पत्रकारितेची सुरुवात करून आपल्या लेखणीच्या बळावर मंत्रालयापर्यंतचा प्रवास करणारे, संयमी, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकार बाबुराव इंगळे साहेब यांच्या निधनाची बातमी, अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत, त्यांच्या समस्या निर्भीडपणे प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या साधेपणाने, संयमी स्वभावाने आणि सत्यनिष्ठ लेखणीने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण भागातून आलेला हा पत्रकारितेतील हिरा आपल्या कार्यातून अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. बिलोली तालुक्यातील कासराळी येथील ते रहिवाशी होते त्यांच्या जाण्याने तालुक्यातील सर्व पत्रकार,व कुटुंबाला,नातेवाईकांना, मोठा धक्का बसला आहे त्यांच्या पश्चात, दोन मुलं,व दोन मुली व इंगळे परिवार व नातेवाईकांच्या मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे,
त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक संवेदनशील, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
स्वर्गीय पत्रकार बाबुराव इंगळे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली!ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

