पातूरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
( पातुर अकोला तालुका प्रतिनिधी )
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संत रविदास नगर येथे मोहन मूलचंद पुरुषोत्तम वय 50 वर्ष यांनी दिनांक 26 ऑगस्ट 2026 ला दुपारी चार वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील पंख्याला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली सदरची माहिती पातुर पोलिसात दिल्यावर पातुर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तथा शव विच्छेदन साठी मृतदेह अकोला सर्वोपच्चर रुग्णालय येथे पाठविला आत्महत्या मागचे कारण अजून समजू शकले नाही मृतकांच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगी तीन मुले बहीण असा आप्त परिवार आहे दिनांक 27 ऑगस्ट 2026 ला त्यांच्यावर पातुर समशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला सदरच्या घटनेने पातूरात हळहळ व्यक्त होत आहे

