एका फोनने घेतली दखल; बाजीराव दादा चव्हाण यांच्या सहकार्याने रुग्णाला उपचाराच्या खर्चात मोठी सवलत.. संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती; रुग्णाच्या मदतीसाठी अवघ्या १५ मिनिटांत शिफारसपत्र

एका फोनने घेतली दखल; बाजीराव दादा चव्हाण यांच्या सहकार्याने रुग्णाला उपचाराच्या खर्चात मोठी सवलत..

 संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती; रुग्णाच्या मदतीसाठी अवघ्या १५ मिनिटांत शिफारसपत्र

(बीड | प्रशांत बाफना विभागीय संपादक)

 गरजू रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्याचे काम विविध सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू आहे. अशाच प्रकारे एका गरजू रुग्णाला उपचाराच्या खर्चात मोठी सवलत मिळवून देत युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. अवघ्या १५ मिनिटांत मदतीचा हात दिला आहे. विठ्ठल रामभाऊ गाडेकर यांच्यावर अहिल्यानगर येथील एंजिओप्लास्टी साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या उपचारासाठी तब्बल ४ लाख १० हजार रुपयांचे बिल झाले होते. एवढ्या मोठ्या रकमेचा खर्च भागविताना कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर उपचाराच्या बिलात सवलत मिळावी, यासाठी गाडेकर कुटुंबीयांनी बाजीराव दादा चव्हाण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. कुटुंबीयांच्या या विनंतीची तात्काळ दखल घेत बाजीराव दादा चव्हाण यांनी संबंधित रुग्णालयासाठी शिफारसपत्र दिले. विशेष म्हणजे, अवघ्या १५ मिनिटांत शिफारसपत्र मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. या पत्राच्या माध्यमातून रुग्णालयाकडून उपचाराच्या बिलात मोठी सवलत मिळाली. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गाडेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण यांच्या वतीने गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचे कार्य सुरू आहे. रुग्णांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देणे, गरजू कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि संकटसमयी तत्परतेने सहकार्य करणे, ही समाजसेवेची महत्त्वाची बाजू आहे. याच भावनेतून बाजीराव दादा चव्हाण यांनी गाडेकर कुटुंबीयांच्या विनंतीला प्रतिसाद दिल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले आहे.

कुटुंबीयांकडून मनःपूर्वक आभार

उपचाराच्या खर्चात सवलत मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गाडेकर कुटुंबीयांनी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब, मंगेशजी चिवटे यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. अडचणीच्या काळात मिळालेली मदत ही संबंधित कुटुंबासाठी केवळ आर्थिक सवलत नसून, मानसिक आधार देणारी ठरते. गाडेकर कुटुंबीयांच्या या अनुभवातून गरजूंच्या मदतीसाठी तत्परतेने पुढे येण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे
Previous Post Next Post