श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..
(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा 2026 -27 चे आयोजन करण्यात आले आहे .
सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी दहा वाजता श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री .हर्ष दादा अरुण तनपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री .भारत वारुळे सर उपाध्यक्ष श्री विवेकानंद नर्सिंग होम प्रश्न श्री .कृष्णा मुसमाडे विश्वस्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ श्री .अरुण ढुस उपाध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान श्री .आबासाहेब वाळुंज ट्रॉफी सौजन्य व व्हॉइस चेअरमन आदर्श पतसंस्था श्री .नितीन घोलप सर अध्यक्ष राहुरी तालुका क्रीडा संघटना श्री .गणेश म्हसे कार्य अध्यक्ष राहुरी तालुका क्रीडा संघटना या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेची सुरुवात होणार असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य श्री .बी एल शिरसाट सर चव्हाण सर चव्हाण सर पर्यवेक्षक पाटील सर शिक्षक प्रतिनिधी माध्यमिक विभाग व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक लांडगे सर शिक्षक प्रतिनिधी उच्च माध्यमिक विभाग सौ .गव्हाणे मॅडम शिक्षिका प्रतिनिधी माध्यमिक विद्यालय कांबळे मामा शिक्षकेतर प्रतिनिधी उच्च माध्यमिक विद्यालय तरी या तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेसाठी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या पालक वर्गांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

