संतोष रामकृष्ण उपरवट यांची पोलीस मित्र, अपराध नियंत्रण व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अकोला जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती
अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी
पातूर : पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील संतोष रामकृष्ण उपरवट यांची पोलीस मित्र, अपराध नियंत्रण एवं अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या अकोला जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजहंस अंबादास वढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. संतोष उपरवट यांनी संघटनेच्या सभासद नोंदणी अर्जाद्वारे सामाजिक कार्य, जनजागृती आणि मानवाधिकारविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
संघटनेच्या माध्यमातून पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय निर्माण करणे, अपराध प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, मानवाधिकार जनजागृती मोहिमा राबविणे, सामाजिक सलोखा व कायदेविषयक जागृती वाढविणे, तसेच गरजू नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
संतोष उपरवट यांच्या नियुक्तीबद्दल पातूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात संघटनेचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच संतोष उपरवट पोलीस टाईम मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी सुद्धा आहे
संतोष उपरवट पत्रकार
पोलीस टाईम मीडिया अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी✍️

