नांदेड मध्ये अ ब क ड उपवर्गीकरणासाठी उसळला लाखोचा मातंग समाज

नांदेड मध्ये अ ब क ड उपवर्गीकरणासाठी उसळला लाखोचा मातंग समाज..


मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : मध्ये उपवर्गीकरण समर्थनात लाखोंचा महामोर्चा दिनांक १ ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याला अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरणाचे अधिकार दिले असून महाराष्ट्र सरकारने मात्र आरक्षण उपवर्गीकरण करत नसल्याबद्दल महाराष्ट्र सरकार च्या विरोधात लाखाचा मातंग समाज नांदेडमध्ये एकवाटला होता हा मोर्चा डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्हा व जिल्हाधिकारी पाठवते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन पर्यंत नांदेड मातंग समाज लाखोच्या संख्येने उपस्थित होता. समाजाचे नेते उपस्थित अजिंक्य चांदणे, शिवकुमार कांबळे, सचिन भाऊ साठे, आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर, लातूरचे आमदार सुधाकर भालेराव, पुणे सेंट्रल चे आमदार कांबळे साहेब,व नांदेड जिल्ह्यातील मातंग सकल समाज नेते मारुती वाडेकर, साहेबराव अंजनीकर, भगवान एडकेवार,मुकुंदर कुडके,संदीप कटारे, दीपक एडकेवार, पत्रकार मारोती एडकेवार,संगम दादा बेलके देगलूरकर,नारायण गायकवाड, व लाखोंच्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज उपस्थित होता. यावेळी अजिंक्य भाऊ चांदणे यांनी बोलताना मातंग समाजाने बाबासाहेबांना विसरायचं नाही बाबासाहेबांमुळे आमचा अस्तित्व आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शहीद पोचीराम कांबळे यांची आपण अवलाद आहोत असे म्हटले आहे 
 व नांदेड जिल्ह्याचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी हा मोर्चा व आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात आंदोलन नसून सरकारच्या विरोधात आहे व मी सरकारमध्ये आहे आरक्षणाचे वर्गीकरण होणार आणि आरक्षणाचे उपकरण झाल्याशिवाय मी शांत राहणार नाही अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
Previous Post Next Post