*समाजसेवेचा पवित्र वारसा जपणारे वसीम भैया शेख यांच्या पुढाकाराने आणि जळगाव जिल्ह्याचे नेते सन्माननीय अनिल भाऊ चौधरी यांचे मित्र परिवाराच्या वतीने* *एक अत्यंत स्तुत्य व* *कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात* *आला*/.
(खिरोदा प्र.रावेर तालुका प्रतिनिधी तय्यब तडवी)
रावेर तालुक्यातील अहिरवाडी मोहगन या गावातून हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरबारात दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने पायी निघालेल्या अजमेर पदयात्री (वारकरी) बांधवांचे पाडला गावामध्ये आगमन झाले. यावेळी पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचा वसीम भैया शेख आणि जळगाव जिल्ह्याचे नेते सन्माननीय अनिल भाऊ चौधरी यांचे मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत आपुलकीने व उत्साहात सत्कार करण्यात आला.
दीर्घ आणि खडतर पायी प्रवासात वारकऱ्यांना दिलासा मिळावा या उदात्त हेतूने मित्र परिवाराने सर्व वारकरी बांधवांना फळ आणि थंड पाण्याचे वाटप केले. तसेच त्यांच्या पुढील सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजसेवेची ही भावना आणि वारकऱ्यांप्रती असलेली आस्था पाहून उपस्थित सर्व पदयात्रिक भावूक झाले आणि त्यांनी मित्र परिवाराचे मनापासून आभार मानले.
या प्रसंगी वसीम भैया शेख, जळगाव जिल्ह्याचे नेते सन्माननीय अनिल भाऊ चौधरी यांचे मित्र परिवारातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सेवेचा सुंदर संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

