सगुना कंपनी वणी हिगणघाट येथे अपहार करून विश्वासघात करणा-या आरोपीना उत्तरप्रदेश येथुन अटक..
(मो.मकसुद बावा हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक )
छोटी वणी हिंगणघाट येथील सगुना कंपनीचे मॅनेजर फिर्यादी नामे जानकीराम आदिविरा वय 58 वर्श रा. आदिगपेठ पॉडेचेरी ह.मु. जोगनपु़त्रा लेआवुट हिंगणघाट यांनी पोलीस स्टेषन हिंगणघाट येथे दिनांक 19.08.26 रोजी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र. 1342/26 कलम 316(3) भान्यासं.अन्वये गुन्हा नोंद असुन दि. 01/08/2026 रोजी टेलर क्र. यु.पी. 42 डी.टी. 3644 चे चालकाने त्याचे टेलर मध्ये सगुणा कंपनी येथुन सोया डीओसी पषुखादय वजन 41.960 मेट्रीक टन की. 29,28,095/रू. चे भरून ते पषु खादय मुजफर राज्य बिहार येथे घेवुन जाण्यास निघाला असता त्याने सदर टेलर मध्ये भरून असलेले पशुखादय मुजफर राज्य बिहार येथील कपंनीमध्ये न पोहचविता सदर मालाचा अपहार करून फिर्यादिचा विष्वासघात केला व फरार झाला.
सदर गुन्हयाचे तपासमध्ये पो.नि. श्री. अनिल राउत सा. यांचे सुचनेप्रमाणे पोलीस स्टेषन हिंगणघाट येथील पोलीस टिम आरोपी व मालाचे शोधकरीता मिर्झापुर उत्तरप्रदेष येथे पोहचुन तांत्रिक व गुप्त मिळालेल्या माहितीवरून ट्रेलर ट्रकचा क्लिनर नामे युगराजसिंग यादव यास षिताफीने ताब्यात घेवुन त्यास गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने व टेलर ट्रक चा चालक अंषुल वर्मा रा. अयोध्या असे दोघांनी मिळुन संगणमताने सगुना कंपनी वणी हिंगणघाट येथुन नेलेले सोया डिओसी पषुखादय हे उत्तरप्रदेष येथील कुकुट पालन व्यवसायीकाला विकल्याचे सांगितले.
त्यावरून ट्रेलर ट्रकचा चालक अंषुल वर्मा रा. मजगाव जि. अयोध्या उत्तरप्रदेष याला षिताफीने ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीतांना विष्वासात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील सगुना कंपनीमधील सोयाबिन ढेप पषुखादय हे उत्तर प्रदेष येथील कुक्कुटपालन व्यवसायिकांना विकल्याचे सांगितले. त्यावरून कुक्कुटपालन व्यवसायिक यांचेकडुन गुन्हयातील मालापैकी एकुण 96 बोरी कुक्कुटपालन खादय की.अंदाजे. 4,30,560/रू तसेच आरोपीतांनी गुन्हयात वापरलेला ट्रेलर ट्रक क्र. यु.पी. 42 डि.टी. 3644 की.45,00,000/रू. तसेच नमुद दोन्ही आरोपींनी सदर गुन्हयातील मालाची विक्री करून मिळालेल्या पैषातुन खरेदी केलेला मुदेमाल ज्यात एक व्हिओ कंपनीचा मोबाईल मॉडेल टी 4 आर की.
20,000/रू., एक सॅमसंग कंपनीचा एफ 17 मोबाईल की. 20,000/रू., एक पांढ-या धातुची अंगठी ज्यात निळसर रंगाचा निलम खडा असलेली की. 30,000/रू., एका पांढ-या धातुची गळयातील चांदीची चैन अ.की. 10,000/रू., एका पांढ-या धातुचे हातातील चांदीचे बेसलेट अ.की. 10,000/रू. असा. एकुन की. 50,20,560/रू.चा माल जप्त करून सदर गुन्हयात आरोपी क्र.1) अषुल मनसाराम वर्मा वय 33 वर्श रा. मजगाव जि. अयोध्या उत्तरप्रदेष 2) युगराजसिह श्रीरामअधिन यादव वय 27 वर्श रा. भवानीपुर जि.भदोही उत्तरप्रदेष यांना अटक करून सदरचा गुन्हा उघडकिस आणला.
सदरची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल सा. पोलीस अधिक्षक, वर्धा, अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाषिव वाघमारे सा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक सा.हिंगणघाट यांचे मार्गदर्षनामध्ये पो.स्टे. हिंगणघाट येथील पो.नी.श्री. अनिल राउत सा. यांचे आदेषाने पो.उप.नि. डी.जी.पळनोटे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा.नरेंद्र डहाके, पो.ना नरेंद्र आरेकर, पो.षि. ताबिष बेग यांनी केली.

