ज्यांच्या कारखान्यावर कर्ज त्यांनाच विचारा; सभापती प्रा. राम शिंदे ..
सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय कसा?
(अहिल्यानगर | प्रशांत बाफना विभागीय संपादक)
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या बोलण्यात एकसुत्रता नसल्याने अर्जांची मोठ्या प्रमाणात घेतले गेल्याचा दावा सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला आहे. दरम्यान अनेक कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. सहकार क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याबाबत मला जास्त काही माहिती नाही. ज्यांच्या कारखान्यावर कर्ज आहे, त्यांच्या कारखान्याबाबत तुम्ही त्यांना विचारा. मी कुठल्याही संस्थेचा थकबाकीदार नाही, असे सभापती प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले. माझ्या मनधरणीचा प्रश्न येत नाही. नेत्यांनी त्याबाबत बोलले पाहिजे. मी काही बोलू शकत नाही असे ते म्हणाले.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असली तरी संबंधित सर्व प्रमुख नेत्यांच्या बोलण्यामध्ये एकसूत्रता राहिलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांसाठीची गर्दी पाहता सभासदांनी स्वतःहून फॉर्म घेण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते आहे, असा दावा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला. सभासदांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. ५४१ फॉर्म आत्तापर्यंत सभासदांनी घेतलेले आहेत. यावरून निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होतं, असे सूचक भाष्यही त्यांनी केले. जर एखाद्या गोष्टीचा निर्णय करणार असतील तर सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. सर्वांना विचारात घेऊन करायला हवं, असे भाष्यही त्यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही निवडणूक लढवण्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मागेच जाहीर केले होते व त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सभापती प्रा. शिंदे यांनी आज बुधवारी (दि.३० सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता जिल्हा बँक निवडणुकीचा कोरा उमेदवारी अर्ज घेतला. यासाठी ते जिल्हा बँकेच्या चाहुराणा-मार्केट यार्ड शाखेत आले होते. आता ते प्रत्यक्ष उमेदवारी कधी दाखल करतात याची उत्सुकता आहे.
उमेदवारीचा अर्ज घेतल्यानंतर सभापती प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक आहे. तिचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. बँकेच्या ठेवीदेखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते चांगलेच आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांना पीक कर्ज वितरणही चांगले झाले आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि तिचे कामही चांगले आहे. त्यामुळे ठेवीदार आणि शेतकर्यांचे आर्थिक संरक्षण करणे व त्यांना पाठबळ देणे आपले काम आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणी केल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचाही फायदा बँकेला निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर येथे मीटिंग झाल्यानंतर मला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोन आला होता. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचाही फोन झाला होता. आ. विवेक कोल्हे यांचाही फोन आला होता. मात्र, त्यानंतर यासंदर्भात कुठलीही चर्चा माझ्यासोबत कोणीही केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राखीव पदांबाबत भाष्य करताना ते म्हणाले, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच मी फॉर्म घेतलेला आहे. त्याबाबत आणखी विचार करूनच आता तो फॉर्म भरणार असल्याचे स्पष्ट केले.
नेत्यांच्या बोलण्यात एकसूत्रता नसल्याने अर्ज घेण्यास गर्दी : सभापती प्रा. शिंदेंचा दावा
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असली तरी संबंधित सर्व प्रमुख नेत्यांच्या बोलण्यामध्ये एकसूत्रता राहिलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांसाठीची गर्दी पाहता सभासदांनी स्वतःहून फॉर्म घेण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते आहे, असा दावा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला. सभासदांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. ५४१ फॉर्म आत्तापर्यंत सभासदांनी घेतलेले आहेत. यावरून निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होतं, असे सूचक भाष्यही त्यांनी केले. जर एखाद्या गोष्टीचा निर्णय करणार असतील तर सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. सर्वांना विचारात घेऊन करायला हवं, असे भाष्यही त्यांनी केले.
पालकमंत्र्यांची भूमिका प्रतीक्षेत
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवायची आहे. पण बिनविरोधच्या चर्चांमुळे माझ्या मनामध्ये अजून तोच प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. महायुतीमध्येही पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या मतानुसार त्यांना बिनविरोधसंदर्भातील बैठकीबाबत काही माहीत नाही असेही ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. शिवसेना एकीकडे बैठक घेत आहे आणि म्हणून त्यासंदर्भात सभापती म्हणून मला भूमिका घेण्याची वेळ अजून आली की नाही असा प्रश्न मला पडला आहे, असे भाष्य करून सभापती प्रा. शिंदे म्हणाले

