धन्वंतरी कामगार सहकारी पतसंस्थेची 34 वी वार्षिक सभा उत्साहात ..

धन्वंतरी कामगार सहकारी पतसंस्थेची 34 वी वार्षिक सभा उत्साहात ..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे ) 


राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे असणाऱ्या धन्वंतरी रुग्णालय व महाविद्यालय कामगार सहकारी पतसंस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ .तनपुरे साखर कारखान्याचे संचालक तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली .
सभेस पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे व्हॉइस चेअरमन विजय डुकरे ज्येष्ठ संचालिका चेतना कुलकर्णी डॉ .अनंत कुमार शेको कार निलेश जाधव दत्तात्रय चव्हाण दत्तात्रय हिवाळे ज्ञानेश्वर टिकल शोभा ठुबे विमल हुडे पतसंस्थेचे सेक्रेटरी बोर्डे साहेब तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी विवेकानंद नर्सिंग होम मधील सेवानिवृत्त कर्मचारी भारत खिलारी कैलास कदम श्रीराम कोबरने सौ .नंदा काय गुडे श्रीमती .देव्हारे मावशी यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला त्याचबरोबर निलेश जाधव यांना डॉक्टर रेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार हर्ष तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी बोलताना हर्ष तनपुरे म्हणाले की धन्वंतरी पतसंस्था ही भांडवली दृष्ट्या सक्षम संस्था असून संस्थेची आर्थिक परिस्थिती प्रगतीपथावर असून संस्थेचे भवितव्य उज्वल आहे भविष्यात कधीही डॉ .तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पतसंस्थेला आवश्यक ते सहकार्य करेल पतसंस्था चालविताना चेअरमन गजानन वराळे व संचालक मंडळाने विश्वास व कामकाजातील पारदर्शकता कामगार व सभासदांचे हित जपले आहे असेही तनपुरे यांनी नमूद केले .
चेअरमन गजानन वराळे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला संस्थेला झालेल्या नफ्यातून यावर्षी सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष अरुण साहेब तनपुरे व विश्वस्त मंडळाचे मार्गदर्शन तसेच सभासदांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याने चा चांगल्या पद्धतीने प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले .
यावेळी सदर सभेस जेष्ठ सभासद डॉ.विलास कड डॉ .बांगर सर नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गागरे सर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नागरगोजे सर धन्वंतरीचे माजी चेअरमन भगवान म्हसे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
सभेचे सूत्रसंचालन डॉ .सतीश धोंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पतसंस्थेचेव्हॉइस चेअरमन विजय डुकरे यांनी मानले .
Previous Post Next Post