देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीत रस्त्याची दैना जिकडे -तिकडे खड्डेच खड्डे..
शहराचे नाक तरी दुरुस्त करा विरोधी पक्षनेते दासू भाऊ पठारे यांची मागणी..
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
एकेकाळी स्वच्छता सुशोभीकरण आणि दर्जेदार रस्त्यांमुळे जिल्ह्यापासून तर देशपातळीपर्यंत नावलौकिक मिळविलेल्या देवळाली प्रवरा शहरातील तसेच राहुरी फॅक्टरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरक्षता दूर अवस्था झाली आहे शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिक नगरपरिषदेच्या सत्ताधारी यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत .
सन 2001 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन गृह व नगर विकास मंत्री स्व .आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात देवळाली प्रवरा शहराने उल्लेखनीय कामगिरी केली होती तत्कालीन नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्व .बाळासाहेब चव्हाण यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेता शहरातील रस्ते रुंद व सुशोभित केले पुढील काळातही ही विकास कामांची परंपरा कायम राहिली मात्र सध्या शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्याची अवस्था खराब झाली असून सोसायटी डेपो ते बाजारतळ तसेच मातंग वस्ती ते चारी या मार्गाची अवस्था विशेषता बिकट झाली असून वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे शहरातील भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 70 कोटी रुपयांची कामे झाली या कामानंतर रस्त्यांची करण्यात आलेली जुजबी दुरुस्ती आणि त्यानंतर पडलेले खड्डे यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .
शहराचे नाक तरी दुरुस्त करा -
नगरपरिषदेचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते तुकाराम (दासू भाऊ )पठारे यांची मागणी
शहरातील रस्त्यांची अवस्था भयानक झाली आहे शहरातील काही खड्डे बुजवण्यासाठी आम्ही स्वतः खर्च करण्यास तयार असून नगराध्यक्षांना तसे आम्ही सांगितले आहे रस्त्याची साधी करण्याऐवजी इतर ठिकाणी पैसे खर्च केले जात आहे मुरूम टाकल्याने चिखल होईल मात्र तूर्तास खड्डे बुजवल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो नगर परिषदेचे सत्ताधारी यांनी आपल्या शहराचे नाक तरी दुरुस्त करावे सोसायटी डेपो ते बाजारतळ रस्ता एका बाजूला सरकून एक साईट वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने हे काम रखडले आहे असा आरोप नगर परिषदेचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते तुकाराम (दासू भाऊ )पठारे यांनी केला आहे

