यावल तालुक्यातील ८ गावांमध्ये कोतवाल पदांची भरती २८ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत. यावल तहसीलदार यांचे जाहीर आवाहन..

यावल तालुक्यातील ८ गावांमध्ये कोतवाल पदांची भरती २८ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत. यावल तहसीलदार यांचे जाहीर आवाहन..

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२६ सप्टेंबर 
 महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत यावल तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत यावल तहसीलदार कार्यालयाने जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे.

यावल तहसील कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रानुसार यावल तालुक्यातील ८ गावांमध्ये कोतवाल पदे रिक्त आहेत. शासनाच्या प्रचलित नियमानुसार या रिक्त पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय यावल येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
आरक्षण सोडत रविवार दि.२८ सप्टेंबर २०२६ वेळ सकाळी ११ वाजता यावल तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी भाग फैजपूर यांच्या अध्यक्षतेखाली सोडत होणार आहे. 
रिक्त पदे असलेली 8 गावे
तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार खालील गावांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदे रिक्त आहेत पाडळसे,आमोदे, पिंपरूड,फैजपूर,मारूळ,मालोद
टाकरखेडा,दुसखेडा 
ही आरक्षण सोडत ही केवळ आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही आहे.त्यानंतर पदभरतीची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.त्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अटी व शर्ती नमूद करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.

संबंधित वरील ८ गावातील नागरिकांनी सदर आरक्षण जाहीर करण्याच्या कार्यवाहीस उपस्थित राहून नोंद घ्यावी असे आवाहन यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे.

तसेच संबंधित गावांच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की,त्यांनी आपल्या साझामधील महसुली गावात जाहीर दवंडी देऊन दवंडी रजिस्टरची नक्कल कार्यालयास सादर करावी आणि हे जाहीर आवाहन चावडी,ग्रामपंचायत कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यापक प्रसिद्धी करावे असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी नमूद केले आहे
Previous Post Next Post