वांबोरी रेल्वे गेट जवळील श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर..
(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वांबोरी रेल्वे टेशन गेटच्या जवळच असणाऱ्या श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नुकत्याच निवडी खडांबे खुर्द येथील ग्रामस्थांनी जाहीर केल्या आहेत .
श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्षपदी शामराव खेसम्हाळसकर यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब लटके यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर ट्रस्टच्या सचिव पदी गोरक्षनाथ कल्हापुरे तर सेक्रेटरी पदी उत्तमराव कल्हापुरे तसेच अन्य सदस्यांची ही निवड ट्रस्टच्या कमिटी मध्ये करण्यात आली आहे .
श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सेक्रेटरी व सदस्य यांची नव्याने निवड झाल्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राहुरी तालुका अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे त्याचबरोबर खंडाबे खुर्द ग्रामस्थांनी व वांबोरी रेल्वे स्टेशन परिसरातील जाधव परिवाराने अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .

