निशांत खोलेची एम्स अंतर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी निवड
(एकता फाउंडेशन व म.सा.प.च्या वतीने सत्कार)
अहिल्यानगर (प्रशांत बाफना) :
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी हरिभाऊ खोले यांचा मुलगा निशांत खोले याची एम्स अंतर्गत एम.बी.बी.एस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला. नीट परीक्षेत 645 गुण मिळवत त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला असून हैदराबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात तो आपले एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण करणार आहे. या वेळी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी संचालक, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, एकताचे कोषाध्यक्ष तथा म.सा.प.शिरूर कासार चे कार्यवाह शिवलिंग परळकर, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, सेवानिवृत्त प्राचार्य सुधाकर खोले, कार्यकारिणी सदस्य महादेव राऊत, महिला आघाडीच्या लता बडे-कराड, डाॅ.स्नेहल कराड-सानप, हरी खोले, सौ.खोले यांची उपस्थिती

