चारधाम यात्रेस निघालेल्या किनगाव येथील भाविकाचा यमुनोत्री येथे ह्रदय विकाराने मृत्यू्, हरिद्वार येथे बुधवारी होणार अंत्यसंस्कार.

चारधाम यात्रेस निघालेल्या किनगाव येथील भाविकाचा यमुनोत्री येथे ह्रदय विकाराने मृत्यू्, हरिद्वार येथे बुधवारी होणार अंत्यसंस्कार.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२९ सप्टेंबर २०२६
 तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील भाविक,भक्तांचा एक जत्था चारधाम यात्रेसाठी गुरुवारी निघाला होता. दरम्यान या भाविक,भक्ताच्या पथकातील ६४ वर्षीय वृद्धाचा यमुनोत्री येथे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 
दर्शन घेऊन परत येत असतांना ही घटना घडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले तर या वृद्ध इसमावर बुधवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी उत्तराखंडातील हरिद्वार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवाशी दगडू ओंकार पाटील वय ६४ हे त्यांच्या पत्नी विठाबाई पाटील व किनगाव गावातील सुमारे २२ जणांच्या सोबत दिनांक २४ सप्टेंबर गुरुवार रोजी चार धाम यात्रेसाठी निघाले होते. २६ सप्टेंबर रोजी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे पोहोचले होते व तेथून ते विविध ठिकाणी दर्शन घेत २८ सप्टेंबरला यमुनोत्री येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविक, भक्त परतीच्या मार्गाला निघाले तेव्हा दगडू पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना तातडीने सहकारी भाविकांनी रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांना देण्यात आली. त्यांच्यावर हरिव्दार तीर्थक्षेत्रावर अंत्यसंस्कार केले जावे असा निर्णय कुटुंबाने घेतला तेव्हा ३० सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता हरिव्दार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्याचे मुलं उत्तरखंड येथे रवाना झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुलगा नेदरलॅंडहून थेट रामेश्वरला दाखल.
दगडू ओंकार पाटील यांचा मोठा मुलगा किरण पाटील हा नेदरलँड येथे राहतो घटनेची माहिती मिळताच तो लंडन मार्गे दिल्लीला रात्री दाखल झाला असून बुधवारी तो त्याची पत्नी त्याची दोन मुलं हे हरिव्दर दाखल झाल्यानंतर अंत्यविधी केली जाणार आहे. त्यांचा लहान मुलगा चेतन पाटील हा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नगर रचना विभागात प्रशासकिय अधिकारी असुन तो देखील सह कुटुंब हरिव्दारला रवाना झाला आहे.-पुर्ण-फोटो आहे
Previous Post Next Post