नाग मंदिर चौकात, 40 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या! दुचाकीवरून जात असताना मानेवर वार ; भद्रावती पोलीसाकडून तपासाला वेग

नाग मंदिर चौकात, 40 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या! दुचाकीवरून जात असताना मानेवर वार ; भद्रावती पोलीसाकडून तपासाला वेग 

( महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)



भद्रावती 23: शहरातील नागमंदिर चौक परिसरात आज सकाळी दुचाकीवरून जात असलेल्या ४० वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मानेवर गंभीर वार झाल्याने उमदेव भावराव मेश्राम वय ४०, रा. देऊरवाडा, हल्ली मुक्काम शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित केले. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, घटनेमागील पार्श्वभूमी आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात आहे.
Previous Post Next Post