आम्ही काय दारू-गांजा विकतो का? प्रामाणिकपणे फळं विकून पोराबाळांचं पोट भरतोय!’; अकोला बस स्टँड परिसरातील मनपाच्या कारवाईवर ठेलेवाल्यांचा तीव्र संताप*

*‘आम्ही काय दारू-गांजा विकतो का? प्रामाणिकपणे फळं विकून पोराबाळांचं पोट भरतोय!’; अकोला बस स्टँड परिसरातील मनपाच्या कारवाईवर ठेलेवाल्यांचा तीव्र संताप* 

(मीडिया पोलिस टाईम जिल्हा संपादक इमरान खान)

अकोला:"आम्ही काय दारू किंवा गांजा विकून अवैध धंदा करत नाही. दिवसाला कष्टाने चार-पाचशे रुपये कमावतो, फळं विकून आपल्या पोराबाळांचा प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करतो. पण मनपाने आमचे ठेले तोडून, माल फेकून आम्हाला थेट रस्त्यावर आणले आहे," असा अत्यंत संतप्त आणि रोकठोक सवाल अकोल्यातील एका पीडित फळविक्रेत्याने उपस्थित केला आहे. अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्टँड परिसरात महानगरपालिकेच्या (मनपा) अतिक्रमण विरोधी पथकाकडून झालेल्या अमानुष कारवाईनंतर गरीब व्यापाऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.कर्ज काढून आणलेला माल रस्त्यावर फेकलाअकोला बस स्टँड आणि आसपासच्या परिसरात मनपाच्या पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ही धडक कारवाई सुरू केली. या कारवाईत १० ते १५ हजार रुपये खर्च करून तयार केलेले ठेले पूर्णपणे तोडून टाकण्यात आले. इतकेच नाही, तर व्याजाने आणि कर्ज काढून ठेल्यावर विक्रीसाठी भरलेला सुमारे १० हजार रुपयांचा फळांचा मालही कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फेकून नष्ट केल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.‘आमची नुकसानभरपाई कोण देणार?’"रोज केवळ ४०० ते ५०० रुपये मिळतात, त्यात कुटुंब चालवायचे की कर्ज फेडायचे? आमच्यावर थेट गुन्हेगारांसारखी कारवाई केली गेली. आता आमचे जे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मनपा प्रशासन देणार का?" असा सवाल रडकुंडीला आलेल्या फेरीवाल्यांनी विचारला आहे. बस स्टँड परिसर हा प्रवाशांच्या गर्दीचा भाग असल्याने अनेक वर्षांपासून गरीब कुटुंब येथे आपला व्यवसाय करून पोट भरत आहेत.या अमानुष कारवाईमुळे शहरातील छोट्या व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, मनपाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वेंडर्सनी दिला आहे.
Previous Post Next Post