राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे रायगड जिल्हा अधिवेशन महाड येथे संपन्न झाले.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे रायगड जिल्हा अधिवेशन महाड येथे संपन्न झाले.

(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)

दि. 20 सप्टेंबर 2026 महाड चवदारतळे येथे महाड नगरपरिषद कंत्राटी सफाई कामगार तसेच पर्मनंट कामगार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, प्राध्यापक प्राथमिक शिक्षक माद्यमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी (protan) रायगड तसेंच आशा कर्मचारी यांचे संयुक्त जिल्हा स्तरीय अधिवेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदारतळे महाड येथे संपन्न झाले. अधिवेशनाचे उदघाटक मा. संदीप जाधव, महाड नगरपरिषद उपनगराध्यक्ष, तसेच राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव मा. गोरखनाथ वेताळ यांनी अध्यक्षता केली. मा. उपगराध्यक्ष संदीप जाधव यांनी कंत्राटी कामगारांवरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, ज्या कर्मचाऱ्यामुळे राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता अभियानात महाड नगर परिषदेला दोन वेळा मानांकन मिळवून दिले आहे, कंत्राटी कामगारांच्या pf चा प्रश्न असेल त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, महिलांच्या आरोग्य सुरक्षा असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तो येत्या पंधरा दिवसात सोडविण्यात येईल ही छत्रपती शिवाजी महाराजांची आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पावन भूमी आहे या महाड सारख्या देशात ख्याती असलेल्या महाडमध्ये असें प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी दिला. मा. गोरखनाथ वेताळ यांनी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ देशभरात कश्याप्रकारे काम करत आहे. कंत्राटी पद्धतीने कश्याप्रकारे कामगारांची पिळवणूक होतं आहे. यावरचे उपाय योजना काय आहेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रमांची प्रस्तावना मा. दीपक मोरे कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ रायगड यांनी केली, यावेळेस मा. विकास कासारे अध्यक्ष कंत्राटी सफाई कामगार RMBKS महाड नगर परिषद मा विजय कासारे सचिव कंत्राटी सफाई कामगार RMBKS महाड नगर परिषद मा. स्वप्नील सकपाळ ( भारत मुक्ती मोर्चा प्रभारी पोलादपूर, मा. अक्षय साळवी पर्मनंट कर्मचारी RMBKS महाड नगर परिषद मा. नरेश जाधव मुंबई महानगर पालिका मा. डॉ धनराज वाघमारे RMBKS protan, मा. उमाताई भोई, तारू मॅडम, मा. धर्मपाल जाधव अध्यक्ष RMBKS रायगड मा. मनोज रामधरणे रायगड जिल्हा महासचिव RMBKS यांनी आपले विचार मांडले शेवटी आभार प्रदर्शन मा. अशोक सकपाळ उपाध्यक्ष रायगड भारत मुक्ती मोर्चा यांनी केले सूत्रसंचालन मा. लक्ष्मण हाटे उपाध्यक्ष RMBKS रायगड यांनी केले यावेळी सर्व पर्मनंट कामगार आणि कंत्राटी कामगार महिला पुरुष मिळून रुपये एकेचाळीस हजार संगठनेला जनआंदोलन निधी महासचिव मा. गोरखनाथ वेताळ यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे महाड अध्यक्ष मा. प्रवीण धोत्रे, मा विनय खैरे, मा. सयाजी तांबे, मा. शिवाजी वाठोरे मा. दिव्या मोरे मॅडम, मा. सारिका जाधव, मा. वाले मॅडम, मा. रुपेश जाधव मा. अरविंद साळवी मा. अमीर डांगे, मा. सचिन साळवी तसेच महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous Post Next Post