नायलॉन मांजाविरोधात ‘नो टॉलरन्स’ची भूमिका,**पतंगबाजी पडणार २५ हजारांना**नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यांना आता चांगलाच फटका बसणार आहे*.

*नायलॉन मांजाविरोधात ‘नो टॉलरन्स’ची भूमिका,*

*पतंगबाजी पडणार २५ हजारांना*

*नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यांना आता चांगलाच फटका बसणार आहे*. 

(मुंबई जिल्हा विशेष प्रतिनिधी)

*नायलॉनने पतंगबाजी करणाऱ्यांना आता २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे*.

*पतंग उडविणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास हा दंड थेट पालकांकडून वसूल केला जाणार आहे.*

*तर नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या विक्रेत्याला अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे*. 

*प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्रपणे दंड आकारला जाणार असल्याने नायलॉन मांजाच्या वापरासह विक्री*
 आणि
*साठवणुकीवरही कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे*.

*नागपूर*
 आणि 
*अमरावती*
 विभागात 
*नायलॉन मांजाची विक्री*, 
*साठवणूक*, 
*वाहतूक*
 आणि 
*वापरावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत*. 

त्यानुसार *जिल्हाधिकारी कार्यालय*, 
*पोलीस आयुक्त कार्यालय*
 आणि
*महापालिका स्तरावर नियमावली तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे*.

*नायलॉन मांजाच्या वापराला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १२ जानेवारी २०२६ रोजी दंडाबाबत आदेश पारित केले होते*. 

या आदेशानुसार *नायलॉन मांजा* वापरून 
*पतंग उडविताना* आढळल्यास संबंधित व्यक्तीला 
*२५ हजार रुपयांचा दंड*
 भरावा लागेल. 

*पतंग उडविताना नायलॉन*
 मांजाचा वापर टाळण्याची जबाबदारी *पालकांवरही* येणार आहे.
 
*विक्रीसाठी साठवणूक करणे*
 किंवा 
*मांजा उपलब्ध ठेवण्याच्या प्रकारांवर या दंडात्मक कारवाईचा परिणाम होणार आहे*. 

प्रत्येक उल्लंघनासाठी *स्वतंत्र दंड* आकारला जाणार असल्याने वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. 

नागरिकांनी न्यायालयाच्या दंडात्मक आदेशांची नोंद घेऊन 
*नायलॉन* मांजाचा वापर टाळावा, 
असे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी 
*अनुप खांडे*
 यांनी केले आहे.
              ***
Previous Post Next Post