*५ अट्टल गुन्हेगार तडीपार ;*
*पोलिस अधीक्षक यांची धडक कारवाई*
(परभणी जिल्हा विशेष प्रतिनिधी)
परभणी :
*जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी*
आणि
*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मोठी कारवाई केली आहे*.
*जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या ५ अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत*.
*हे सर्व आरोपी जबर चोरी*,
*मारहाण*,
*गंभीर दुखापत करणे*,
*बेकायदेशीर घातक हत्यारे बाळगून दंगा करणे*
आणि
*लोकांमध्ये दहशत निर्माण करणे*
*अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होते*.
यामध्ये
*पूर्णा पोलिस ठाण्याच्या*
हद्दीतील एका टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिस अधीक्षक *पंकज कुमावत*
यांनी अंतिम सुनावणी घेऊन या टोळीतील ३ सदस्यांना
*एक वर्षासाठी परभणी* सह शेजारील
*हिंगोली जिल्ह्यातील वसमत*
आणि
*नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका* क्षेत्रातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये टोळीप्रमुख *अंकित ऊर्फ बाळा संजय गायकवाड*
(२२, रा. पूर्णा),
टोळी सदस्य
*आयुष राजेंद्र बरकुटे*
(२०, रा. कोळीवाडा, पूर्णा),
टोळी सदस्य
*श्रीनिवास रमेश गाढवे*
(२१, रा. पूर्णा) यांचा समावेश आहे.
*नवामोंढा*,
*कोतवाली*
हद्दीतील दोघे तडीपार
इतर दोन वेगवेगळ्या प्रकरणांत महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी अंतिम चौकशी पूर्ण करून दोघांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
*नवामोंढा ठाणे* हद्दीतील
*विवेक धनेश्वर साळवे*
(२३, रा. हाडको कॉलनी, परभणी)
याला सहा महिन्यांसाठी तडीपार केले.
*कोतवाली ठाणे* हद्दीतील
*सोहेल खान नयुम खान*
(२२, रा. अजिजीया कॉलनी, परभणी)
याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक
*पंकज कुमावत*,
अपर पोलिस अधीक्षक
*तानाजी चिखले*
यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
*गजेंद्र सरोदे*
आणि पथकाने केली आहे.
***

