लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र धर्माबाद तालुका अध्यक्षपदी देविदास निदानकर यांची नियुक्ती

लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र धर्माबाद तालुका अध्यक्षपदी देविदास निदानकर यांची नियुक्ती 


मारोती एडकेवार
 जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : धर्माबाद लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. रामचंद्र भरांडे सर यांच्या आदेशानुसार,मा. व्ही जी डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष व मा रावसाहेब पवार कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने जेष्ठ आंदोलक तथा लढाऊ सहकारी,
मा.देविदास निधानकर यांची लोकस्वराज्य आंदोलन धर्माबाद, तालूका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
मा. देविदास निधानकर यांच्या निवडीबद्दल शाल पुष्पहार घालून व फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र ही संघटना गेल्या चाळीस वर्षापासून महाराष्ट्रातील दिनदलित, कष्टकरी,कामगारांसाठी लढणारी संघटना असून,या संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा सरकारला धारेवर धरण्याचे काम झाले, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड उपवर्गीकरण व्हावे असे पहिली भूमिका मांडणारी महाराष्ट्रात संघटना लोकस्वराज्य आंदोलन आहे, महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती यांच्यावरती अन्याय झाला तर,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरून अन्याय,झालेल्या गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे यामुळे या संघटनेकडे अनेक युवा तरुणांचे, आकर्षण होत असल्याचं दिसत आहे धर्माबाद तालुक्यातील अनुसूचित जातीतील कार्यकर्त्यांनी, डॉ. रामचंद्र भरांडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला यावेळी उपस्थित लोकस्वराज्य आंदोलनाचे महाराष्ट्र कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दादा पवार,मा. व्ही . जी डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन, व लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष, व सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते व धर्माबाद तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post