गुहा येथील शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सवानिमित्ताने मोफत रक्तदाब व साखर तपासणी.
(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील गुहा येथील शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गुहा गावातील नागरिकांचा रक्तदाब व साखर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
सदर रक्तदाब व साखर तपासणी गुहा प्राथमिक आरोग्य केंद्राचे देविदास सुरसे यांनी केले सदर शिबिरामध्ये 40 ते 50 पुरुष व महिला यांनी आपला रक्तदाब व साखर यांची तपासणी करून घेतली .
शिवराज्य युवा प्रतिष्ठानचे हे गणेश उत्सवाचे पंधरावे वर्ष असून प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही गणेश उत्सव काळामध्ये विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते व पुढील ही वर्षी असेच धार्मिक सामाजिक कार्य प्रतिष्ठानच्या हातून घडावे अशी आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो .
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष साहिल वाबळे उपाध्यक्ष गौरव लांबे खजिनदार धीरज आंबेकर सचिव श्रीकृष्ण कोळसे त्याचबरोबर मंडळातील सदस्य सचिन लांबी अतुल कोळसे गौरव विकास लांबे संदीप लांबे धनेश्वर कोळसे सोमा कोळसे तेजस कोळसे प्रतीक कोळसे ऋषी आंबेकर रवी आंबेकर सार्थक वाबळे शंकर वाबळे श्रीकृष्ण कोळसे ऋषी कोळसे अनिल शेलार सचिन कोळसे राहुल वाबळे साई वाबळे ओमकार कोळसे कृष्णा लांबे प्रसाद आंबेकर अधिक कार्यकर्ते शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील होते .

