*अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्याकडून अकोला पोलिसांचा गौरव; कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा.CCTNS प्रणालीत अकोला जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम; नोडल अधिकाऱ्यांसह टीमचा विशेष सन्मान...वृद्ध दांपत्याला ओलीस ठेवून दिवसाढवळ्या दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी गजाआड..; ३३.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त...पोक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणारे तपास व पैरवी अधिकारीही सन्मानित*

*अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्याकडून अकोला पोलिसांचा गौरव; कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावाCCTNS प्रणालीत अकोला जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम; नोडल अधिकाऱ्यांसह टीमचा विशेष सन्मानवृद्ध दांपत्याला ओलीस ठेवून दिवसाढवळ्या दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी गजाआड; ३३.६२ लाखांचा मुद्देमाल जप्तपोक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणारे तपास व पैरवी अधिकारीही सन्मानित*

(मीडिया पोलिस टाईम अकोला संपादक इमरान खान)

अकोला:अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील 'विजय हॉल' येथे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) मा. डॉ. महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला जिल्ह्याची कायदा, सुव्यवस्था व कामकाजाबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. नुकतीच अत्यंत शांततेत व सुरळीतपणे पार पडलेल्या कावड यात्रा बंदोबस्ताबाबत आयजी डॉ. पाटील यांनी संपूर्ण अकोला पोलीस दलाचे मनःपूर्वक कौतुक केले.या बैठकीदरम्यान केंद्र शासनाने लागू केलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या (BNS, BNSS, BSA) अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी करणारे, न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणारे आणि उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.🏆 CCTNS प्रणालीत अकोला जिल्हा राज्यात प्रथमगुन्हे व गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क प्रणाली (CCTNS) मध्ये अकोला जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून मानाचा तुरा रोवला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल CCTNS चे नोडल अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच CCTNS शाखेच्या अधिकारी एपीआय पुष्पलता वाघ, अंमलदार सतीश भातखडे, निखिल सावळे, शुभम सुरवाडे आणि नारायण नाईक यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.🔍 ३३.६२ लाखांची जबरी चोरी उघड; आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्यारामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध दांपत्याला बांधून ठेवून भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छडा लावला. पोलिसांनी हैदराबाद, नाशिक व अकोला येथून ३ आरोपींना अटक करून २०८.९३७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३३ लाख ६२ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कामगिरीबद्दल एलसीबीचे पीआय नितीन लेव्हरकर, एपीआई गोपाल जाधव, पीएसआय अनिल चव्हाण, पीएसआय संदीप बालोद (तपास अधिकारी), जीपीएसआय विनोद ठाकरे यांच्यासह १८ अंमलदारांच्या पथकाचा गौरव करण्यात आला.⚖️ पोक्सो व बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपींना मिळवून दिली शिक्षापातूर पोलीस: विनयभंग आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये भक्कम पुरावे सादर करून आरोपींना शिक्षा मिळवून दिल्याबद्दल तपास अधिकारी एपीआय गजानन तडसे व कोर्ट पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल वासुदेव मात्रे यांचा सन्मान करण्यात आला.चान्नी पोलीस: बलात्कार आणि बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल तपास अधिकारी पीएसआय गणेश महाजन व पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल अशोक पातोंड यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या आढावा बैठकीला अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), सर्व शाखा अधिकारी व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post