33 कोटी वृक्षलागवड करणारेच झाडांवर कुर्‍हाड चालवतायत !इंग्रजाकडून त्रास होत नव्हता तेवढा यांच्याकडून होत आहे- जरांगे पाटील

33 कोटी वृक्षलागवड करणारेच झाडांवर कुर्‍हाड चालवतायत !इंग्रजाकडून त्रास होत नव्हता तेवढा यांच्याकडून होत आहे- जरांगे पाटील


बीड/प्रशांत बाफना : 


राज्यातील विविध प्रश्नावर जनतेत सरकारविषयी रोष आहे. भीषण दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त असतानाच दुसरीकडे कर्जत भीमाशंकरमधील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कर्जमधील सायडोंगर परिसरातील वृक्षतोड घटनास्थळाला भेट देवून स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही वृक्षतोडील तीव्र विरोध करत घटनास्थळावर जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याचं म्हणाले. केज तालुक्यातील साप्ताहाला भेट देवून आहिल्यानगरवरून कर्जत- भिमाशंकरकडे रवाना होणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. 


रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सायडोंगर परिसरात नियोजत टोरेंट पॉवर या जलविद्युत प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरात लाखो वृक्षांवर कुर्‍हाड चालण्यात येत आहे. सरकारच्या या धोरणाचा सर्वस्तरातून विरोध होत असतानाच आता जरांगे पाटील यांनीही यास कडाडून विरोध केला आहे. वृक्षतोडी संदर्भात सरकारने जनभावना मनात घेतली पाहिजे, हे डोक्यात का घेत नाहीत, असं म्हणत जरांगे पाटीलांनी कर्जत-भीमाशंकर डोंगर परिसरातील वृक्षतोड झालेल्या परिसराला भेट देणार असल्याचा इशारा दिला. पूर्वी इंग्रजांकडून त्रास होत नव्हता तेवढा यांच्याकडून (सरकार) होत आहे. उद्या बीडमधून दुपारी 2:00 वाजेनंतर रवाना होणार असून बुधवार दि.28 ऑक्टोबर रेाजी आम्ही कर्जत- भीमाशंकरला भेट देणार आहोत. असंही जरांगे पाटील म्हणाले. 


एकीकडे 33 कोटी वृक्षांची लागवड करायची आणि दुसरीकडे आपणच वृक्षतोड करायची. त्यामुळे सरकारने जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे, पण सरकारची वाटचाल दंडेलशाही पद्धतीने सुरू आहे . पूर्वी इंग्रजांकडून त्रास होत नव्हता तेवढा यांच्याकउून होत आहे असं म्हणत जरांगे पाटलांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला
Previous Post Next Post