आकाशातील जगावेगळी शौर्यगाथा!*विशेष लेख प्रशांत बाफना 8055440385

आकाशातील जगावेगळी शौर्यगाथा!*

विशेष लेख प्रशांत बाफना 8055440385


(महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक प्रशांत बाफना)

विमानाचा थरथराट आणि ढगांची शांतता प्रवासी ऐकत होते, तर बहुतांश प्रवासी झोपी गेले होते. हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानात जेव्हा १७४ हून अधिक प्रवाशांचे आयुष्य केवळ एका क्षणावर अवलंबून होते, तेव्हा भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार हे काळाच्या आणि संकटाच्या मध्ये भक्कम ढालीसारखे उभे राहिले. त्यांच्या या धाडसात भारताच्या शतकानुशतके चालत आलेल्या समृद्ध शौर्य परंपरेची आणि कधीही न झुकणाऱ्या पराक्रमी वृत्तीची स्पष्ट झलक पाहायला मिळाली. त्या दिवशी फ्लाय दुबईचे विमान नेहमीप्रमाणेच आपल्या प्रवासाला निघाले होते. प्रवासी आपापल्या विचारात आणि विश्रांतीत मग्न होते. पण अचानक विमानात एका हल्लेखोराने भीषण हल्ला केला आणि संपूर्ण वातावरणात भीतीचे सावट पसरले. प्रवाशांच्या आणि क्रू सदस्यांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला होता. कॅप्टन स्मित मच्छार हे केवळ कॉकपिटचे नियंत्रण सांभाळणारे पायलट नव्हते, तर त्यांच्यात भारतीय भूमीच्या रक्तातील एक खरा योद्धा आणि धाडसी बाणा जागा झाला. 'दुसऱ्यांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणे' हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि तोच आदर्श त्यांनी त्या कठीण प्रसंगी जपला. 

ओमानी को-पायलटने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. कॅप्टन गंभीर जखमी झाले आणि त्याचवेळी विमान वेगाने खाली येऊ लागलं. विमान ३४ हजार फूटांवरून काही वेळातच १४ हजार फुटांहून अधिक खाली आलं. विमानात बसलेल्या प्रवाशांना नेमकं काय घडतंय हे कळत नव्हतं. पण विमानाची ज्या वेगाने खाली येत होत, ते पाहता प्रत्येकाच्या मनात आता आपण वाचणार का? ही भीती निर्माण झाली होती. पण गंभीर जखमी झाल्यानंतरही कॅप्टन स्मित यांनी हार मानली नाही. रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांनी प्रतिकार केला. आपत्कालीन सिग्नल पाठवला. कॉकपिटचं दार उघडलं आणि क्रूला मदतीसाठी बोलावलं. त्यानंतर प्रवासी आणि क्रू पुढे आले. हल्लेखोराला काबूत आणण्यात आलं. विमानात असलेल्या दोन ऑफ-ड्यूटी पायलट्सनी नियंत्रण घेतलं आणि विमान सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षितपणे उतरवलं. हल्लेखोराचा सामना करताना कॅप्टन स्मित स्वतः गंभीर जखमी झाले. अंगातून रक्त वाहत होते, वेदना असह्य होत्या, परंतु त्यांच्या मनातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याची प्रेरणा या वेदनांपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. गंभीर दुखापत झालेली असतानाही कॅप्टन स्मित यांनी एक पाऊलही मागे हटवले नाही. 'रणांगणातून माघार नाही' या भारतीय शौर्य वृत्तीला जागून त्यांनी अत्यंत हिमतीने त्या हल्लेखोराचा प्रतिकार केला. त्यांच्या या अतुलनीय धाडसामुळे क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांच्या मनातही अभूतपूर्व धैर्य निर्माण झाले. कॅप्टनच्या अतुलनीय नेतृत्वाखाली आणि मदतीने सर्वांनी मिळून त्या हल्लेखोरावर नियंत्रण मिळवले आणि त्याला जागीच रोखले. आपल्या प्राणाची पर्वा न करता, स्वतः अत्यंत जखमी अवस्थेत असूनही त्यांनी विमानातील १७४ प्रवाशांचे आणि क्रू सदस्यांचे प्राण सुरक्षित ठेवले. या अभूतपूर्व शौर्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कॅप्टन स्मित यांच्या या असाधारण धैर्याला सलाम केलाच पाहीजे. संकटाच्या आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असतानाही दाखवलेली ही असामान्य हिंमत, कर्तव्यनिष्ठा आणि भारतीय शौर्याचा वारसा जगभरातील लोकांसाठी अत्यंत स्फूर्तीदायक ठरली आहे. कॅप्टन स्मित मच्छर यांनी आपल्या पराक्रमाने हेच सिद्ध करून दाखवले की, भारतीय शौर्य परंपरा फक्त जमिनीपुरती मर्यादित नसून, ती आकाशातही तितक्याच तेजाने तळपते. खरे हिरो युनिफॉर्ममध्ये फक्त विमाने उडवत नाहीत, तर प्रसंगी प्राणाची बाजी लावून हजारो विश्वासू जिवांचे रक्षणही करतात. विमान जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर काय होऊ शकतं, हे जगाने अमेरीकेतील घटनेतून पाहिलं होतं. म्हणून ३४ हजार फूटांवर विमानात हल्ला होतो, कॅप्टन गंभीर जखमी होतो, विमान वेगाने खाली येतं आणि आत शेकडो लोक असतात, तेव्हा त्या प्रवाशांच्या मनात काय चाललं असेल, याचा विचारही करवत नाही. पण यावेळी तसं झालं नाही. कारण त्या कॉकपिटमध्ये एक भारतीय होता आणि त्या भारतीयाने शेवटपर्यंत हार मानली नाही. १७४ प्रवासी म्हणजे फक्त १७४ माणसं नाहीत. त्यांच्या मागे १७४ कुटुंबं आहेत. कोणाची आई वाट पाहत होती. कोणाचं मूल वाट पाहत होतं, कोणाची पत्नी, कोणाचे वडील, त्या सगळ्यांना आपल्या माणसाची वाट पाहत घरी परतायचं होतं आणि म्हणूनच कॅप्टन स्मित यांनी फक्त १७६ लोकांचा जीव वाचवला नाही तर या सर्व कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. ९/११ नंतर विमानातून निर्माण होणाऱ्या संकटाची भीषणता जगाने पाहिली होती. पण यावेळी इतिहासाची तीच पुनरावृत्ती एका भारतीयाने होऊ दिली नाही. स्वतःवर वार होत असताना आणि शरीरातून रक्त वाहत असतानाही त्यांनी कमालीचे धाडस दाखवले आणि कॉकपिटचा दरवाजा आतून अनलॉक केला. दरवाजा उघडताच विमानातील इस्रायली प्रवासी आणि अमिराती क्रू मेंबर्सनी तत्काळ आत धाव घेत या थरारात हस्तक्षेप केला. कॅप्टन स्मित यांच्या या एका कृतीमुळे सर्वांना मदत करण्याची संधी मिळाली आणि रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी विमान सुरक्षित जमिनीवर आणले. भारतीय, इस्रायली, अमिराती देश वेगवेगळे, संस्कृती वेगळी. पण शौर्य आणि माणुसकी एकच दिसली. या सर्वांच्या एकजुटीने आणि अफाट धाडसाने तब्बल १७४ हून अधिक निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचले. खऱ्या अर्थाने जगाच्या काळजाचा ठोका चुकला असता. प्रवाशांनी भरलेले विमान हायजॅक करण्याचा भयंकर कट रचला गेला होता. पण एका भारतीय सुपुत्राने आपल्या प्राणांची बाजी लावत सर्व प्रवाशांना मृत्यूच्या दाढेतून परत आणले!

*निरजा भानोत, तुकाराम ओंबळेंची आठवण झाली*

विमानामध्ये उपस्थित असलेल्या एका डेंटिस्टने स्मितची परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघितली. विमानातील तो एकमेव डॉक्टर असल्यामुळे उपचार करणाऱ्या डेंटिस्टने कसाबसा कॅप्टनच्या शरीरातील रक्त प्रवाह रोखण्यात यश मिळवले. रक्ताच्या थारोळ्यात विमानात खाली पडल्यानंतर देखील कॅप्टन स्मित डॉक्टर बरोबर बोलत होते. धर्माधिष्ठित राजकारणाची किंमत निष्पाप नागरिकांनी का चुकवायची? जर समजा दुबई विमानाची दुर्घटना टळली नसती तर अक्षरशः १७४ प्रवासी असलेले विमान जळून खाक झाले असते. इजरायली पंतप्रधान बेंजामिन नत्यानहू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासह अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. हातात केवळ लाठी असतानाही त्यांनी कसाबला घट्ट पकडून ठेवलं आणि त्याच्या गोळ्या झेलल्या. ओंबळे यांच्या या धाडसामुळे कसाबला जिवंत पकडणं शक्य झालं. तर स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यु पत्करणारी आपली हवाई सुंदरी निरजा भानोत यांच्यापासून ते कॅप्टन स्मित मच्छार यांनी भारताची शान जगामध्ये उंचावली आहे. परंतु प्रत्येक वेळी असे निष्पाप आणि झुंजार छाती असणारे धडाडीचे लोक अशा क्रूर दहशतवादी हल्ल्यांमध्ये कधीपर्यंत बळी पडणार? ही चेन कधी थांबणार आहे का नाही? दशकं वेगळी, संकटं वेगळी, पण इतरांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचं धैर्य मात्र एकच
Previous Post Next Post