शॉर्ट सर्किटने चार एकर ऊस जळून खाक - देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

..शॉर्ट सर्किटने चार एकर ऊस जळून खाक - देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुल हरिभाऊ महांकाळ यांच्या शेतातील चार एकर ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना गुरुवार दिनांक एक ऑक्टोंबर रोजी घडली याआगीत राहुल महांकाळ यांच्या ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .
देवळाली प्रवरा येथील गट नंबर १५५१ / ६ मध्ये राहुल महांकाळ यांची शेती असून शेतातून गेलेल्या वीज वाहिनी मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून ऊस पिकाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहेत काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने जवळपास चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे .
ऊसाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र ऊस हे पीक कोरडे असल्याने आग वेगाने पसरली या घटनेत राहुल महांकाळ या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .
Previous Post Next Post